Mira-Bhayander Municipal Corporation News Saam TV
मुंबई/पुणे

पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादवादाचा कळस! महापालिकेच्या शौचालय बांधणीमध्ये जातीय भेद

पालिकेच्या शौचालय (Toilet) बांधण्याच्या कोटेशनच्या विशिष्ट जातीचा उल्लेख करण्यात आला आहे.

चेतन इंगळे

मुंबई: मीरा-भाईंदर महापालिकेचा (Mira-Bhayander Municipal Corporation) एक हास्यास्पद प्रकार चव्हाट्यावर आला आहे. मीरा-भाईंदर पालिका प्रशासनने चक्क शौचालय बांधण्यावरून जातीय भेद करत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकारावरून नागरिकांसह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पालिकेच्या शौचालय (Toilet) बांधण्याच्या कोटेशनच्या प्रस्तावामध्ये भाईंदर प्रभाग समिती १ मधील जैन समुदायासाठी शौचालय बांधण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शौचालय हे सर्वच नागरिकांसाठी सार्वजनिक असताना पालिकेच्या प्रस्तावात एका विशिष्ट समाजाचा जातीयवादी उल्लेख केला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पाहा व्हिडीओ -

या कोटेशनचा फोटो सध्या व्हायरल (Viral Photo) होत असून पालिकेवर नागरिकांकडून टीका केली जात आहे. या प्रकारावर मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे सांगत कुठल्याही समाजाच्या नावावर शौचालय बांधण्याच्या प्रस्तावाला पालिकेने मंजुरी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT