Police inspect Malad railway station after a professor was stabbed to death following a minor dispute inside a Mumbai local train. Saam Tv
मुंबई/पुणे

मालाड रेल्वे स्थानकात रक्ताचा सडा, क्षुल्लक कारणावरुन प्राध्यापकाची हत्या

Malad Railway Station Murder: मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांमधील वाद नित्याचेच आहेत. मात्र अशाच एका शुल्लक वादातून एका प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागलाय. मालाड रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटनेनं समाजमन सुन्न झालंय.

Suprim Maskar

रेल्वे प्रवासात धक्का लागणं, जागेसाठी होणारे वाद हे नवीन नाहीत...मात्र हे वाद आता जीवघेणे ठरत आहेत. मुंबईची लाईफलाईन असलेली ट्रेन आता रक्तानं माखू लागलीय...पुढे सरकण्याच्या शुल्लक वादातून एका 33 वर्षीय प्राध्यापकाला जीव गमवावा लागलाय. वाद झाल्यानंतर रागाच्या भरात आरोपीने मालाड रेल्वे स्थानकात गाडीतून उतरताना प्राध्यापकाच्या पोटात धारदार शस्त्राने वार करुन पळून गेला. प्राध्यापक आलोक सिंग हे गंभीररित्या जखमी झाले. लोकलमधून उतरुन ते प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

किरकोळ वादातून प्राध्यापकाला जीव गमवावा लागल्यानं ही रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. आरोपी ओमकार शिंदे याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपी ओमकार शिंदेला कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीय...

हा प्रश्न केवळ शिक्षेपुरता मर्यादित नसून, अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ अशा घटनांना आळा घालण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलणार? लोकल ट्रेन आणि स्थानकांवरील सुरक्षा वाढवली जाणार का? धारदार शस्त्रांसह प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनचं तिकीट रद्द करायचंय? जाणून घ्या रेल्वेचे नियम,नाहीतर होईल नुकसान

SCROLL FOR NEXT