Shinde Government Saam Tv
मुंबई/पुणे

Shinde Government : मंत्रालयातील भोंगळ कारभार, लेट लतीफ अधिकाऱ्यांवर शिंदे सरकार मेहरबान?

मंत्रालयातील भोंगळ कारभार

सुरज सावंत

Shinde Government News : मंत्रालयातील कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस उशिरा आल्यास त्याचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश २०१६ मध्ये देण्यात आले. याच आदेशाचा दाखला देत मंत्रालयातील कर्मचारी प्रकाश शिंदे व दिलीप सोनावने या दोन शिपायांना उशिरा येऊन उशिर पर्यंत थांबण्याची परवानगी सचिवांनी दिली असताना अधिकाऱ्यांनी अधिकाराचा दुरुप्योग करून कर्मचाऱ्यांची नियमबाह्य विनावेतन रजा वसुली केल्याचा आरोप आता इतर कर्मचारी करत आहेत.

९ महिन्यांचा रोखून ठेवलेला पगार मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ४१ लेट लतीफ मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडून विनावेतन दिवसाची रक्‍कम मागीतली गेली. लेट लतीफ अधिकाऱ्यांच्या विनावेतन रजा वसुलीच्या फाईली कुठे धुळ खात पडल्या आहेत असा सवाल देखील मंत्रलयातील काही अधिकारी उपस्थित करीत आहेत.

शासन स्तरावरूनही ती रक्कम वसूल करण्याचे कुठलेही ठोस उपाय झाल्याचे दिसत नाहीत. विशेष म्हणजे विनावेतन दिवसांचा पगार घेतलेले तीन उपसचिव दर्जाचे अधिकारी आहेत. यात चार अवर सचिव आणि 7 कक्ष अधिकारी यांचा समावेश आहे. तर उर्वरीत सहाय्यक आणि तत्सम पदावरील कर्मचारी आहेत.

या सर्व लेट लतीफ महाशयांकडून लाखो रूपयांची वसूली मागील आडीच वर्षापासून बाकी आहे. पण दंड भरणारेही तेच आणि वसुली करणारेही तेच असल्याने कारवाई कोण आणि कुणावर करणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या सरकारी बाबूंच्या दिव्याखालाचा अंधारावर कोण प्रकाश टाकणार असा सवाल मंत्रालयातील इतर अधिकारीच विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुळशी तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी लावले डोंगरांना वणवे

Wakad Tourism: वाकडपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत ही थंड हवेची ठिकाणं; या विकेंडला करा प्लान

Belly Fat Loss Drink: पोटाचा वाढलेला घेर कमी करायचा आहे? मग रोज सकाळी प्या हे स्पेशल ड्रिंक

Thane Tourism : मुंबईच्या गर्दीतून घ्या ब्रेक, वीकेंडला फिरा ठाण्यातील 'हे' ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

Thursday Horoscope : करिअरमध्ये नव्या संधी मिळतील, ५ राशींचा आनंदात जाणार दिवस; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT