Ravindra Chavan Saam TV
मुंबई/पुणे

Ravindra Chavan News: मनसेच्या पदयात्रेआधीच मंत्री रवींद्र चव्हाण करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी; वर्षातील चौथा दौरा

Ravindra Chavan News: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून आढावा घेणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Ravindra Chavan News

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून आढावा घेणार आहेत. या वर्षीच्या पावसातला हा त्यांचा चोथा पाहणी दौरा असून मनसेच्या गांधीगिरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. (Latest Marathi News)

मुंबई गोवा महामार्ग मार्गाचे काम गेली 12 वर्षे रखडले आहे. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याच्या एका लेनचे काम पूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता CBT हे नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. रवींद्र चव्हाण आज या तंत्रज्ञानावर आधारित कामाचा आढावा घेणार आहेत. यापूर्वी याच महिन्यात चव्हाण यांनी दोनवेळा महामार्गाच्या कामाची पाहणी केली होती.

दरम्यान, या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी मनसेने आंदोलन पुकारले आहे. उद्या रविवारी 27 ऑगस्टला अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात येणार असून संध्याकाळी कोलाड येथे राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या होणारी अमित ठाकरे यांची पदयात्रा आणि राज ठाकरे यांची सभा या पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा आजचा दौरा महत्व पूर्ण आहे.

मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नी मनसे आक्रमक

मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होऊन सुलभ प्रवास करता यावा, याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून निर्धार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आलं होतं. आता याच मुंबई गोवा महामार्ग प्रश्नी मनसेने आक्रमक भूमिका घेत अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढली जाणार आहे. उद्या रविवारी 27 ऑगस्टला अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News : कचरा संकलन करणाऱ्या गाडीने बालकास चिरडले; धुळे शहरातील धक्कादायक घटना

Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाचा त्याग करणार नाही, भाजप आमदार आक्रमक

Maharashtra News Live Updates: दिलीप वळसे पाटील देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Makeup Tips: मेकअप ब्रशचे किती प्रकार असतात? जाणून घ्या, ते कसे वापरायचे

Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

SCROLL FOR NEXT