Aditi Tatkare: लोरियल इंडिया व माविम यांच्यातील सामंजस्य करारामुळे महिलांच्या आर्थिक प्रगती होणार: मंत्री आदिती तटकरे

Aditi Tatkare: शेतीमधील विविधता लक्षात घेऊन विविध स्टेक होल्डर व ‘माविम’ यांच्या समन्वयाने प्रशिक्षण देणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
Alibaug
AlibaugSaamTv
Published On

Aditi tatkare Latest News

लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यातील सामंजस्य करारामुळे महिलांची आर्थिक उन्नती होणार असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांना प्रदेशनिहाय शेतीमधील विविधता लक्षात घेऊन विविध स्टेक होल्डर व ‘माविम’ यांच्या समन्वयाने प्रशिक्षण देणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

कफ परेड येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे माविम आणि वर्ल्ड इकॉनॉमी फोरममार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमाल विक्रीची साखळी निर्माण करणे (Transforming Farm to Market Value chains leveraging technology in Maharashtra) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महिला व बालविकास मंत्री तटकरे बोलत होत्या.

Alibaug
Mumbai News: मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का! तीन माजी नगरसेवकांचे तडकाफडकी राजीनामे; नेमकं कारण काय?

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव,महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, सेंटर फॉर हेल्थ इंडस्ट्रियल रिवोल्यूशन वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमचे हेड पुरुषोत्तम कौशिक, लोरिअल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आसिफ कौशिक यांच्यासह विविध १९ स्टेक होल्डर्स उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, माविम हे महिला बचतगटांचे अत्यंत उत्कृष्ट संघटन आहे. इकॉनॉमी फोरममार्फत अत्याधुनिक तंत्र व कौशल्य विकास करून शेतमाल विक्रीची साखळी निर्माण करण्यासाठी राज्यातील ‘माविम’च्या बचत गटामार्फत नक्कीच शक्य होणार आहे. आज येथे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टेक होल्डर यांच्या माध्यमातून महिला व बचतगटांना एक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळून अत्याधुनिक बाजारपेठेची माहिती मिळण्यास मदत होईल.

'‘माविम’ आणि लोरियल इंडिया यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे प्रत्येक जिल्ह्यामधील ५ महिलांना प्रशिक्षित करण्यात येणार असून राज्यातील १७५ महिला या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत. लोरियल इंडिया राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३५ ब्यूटी पार्लर उभारणार आहे. यामध्ये ‘माविम’चे देखील सहकार्य लाभणार, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

Alibaug
Kokan News: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; १ सप्टेंबरपासून प्रवास होणार वेगवान

तत्पूर्वी, माविम’ अंतर्गत असलेल्या लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) यांच्या माध्यमातून विविध स्वरुपाच्या व्हॅल्यूचेन सबप्रोजेक्टची उत्पादन साखळीपासून बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी विविध स्टेक होल्डर्स यांनी यावेळी आपले सादरीकरण केले. ‘माविम’ उत्पादक कॅटलॉगचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातील स्वयंसहायत्ता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या निवडक उत्पादनांची माहिती या कॅटलॉगचे यामध्ये देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com