Ravindra Chavan news  saam tv
मुंबई/पुणे

Ravindra chavan |नितीन गडकरी यांनी पैसे दिले, पण...; सार्वजनिक बांधकाम मंत्री स्पष्टच बोलले

'नितीन गडकरी यांनी पैसे दिले. मात्र, काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या', असे रस्त्यावरील खड्ड्यांवरून मंत्री चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Ravindra Chavan News : दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची लगबग असते. कोकणात जाणारे बहुतांश गणेशभक्त मुंबई-गोवा महामार्गाचा वापर करतात. याच मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केली. पाहणीनंतर मंत्री चव्हाण यांनी गणेशोत्सवाच्या आधी खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच 'नितीन गडकरी यांनी पैसे दिले. मात्र, काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या', असे रस्त्यावरील खड्ड्यांवरून मंत्री चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. रविंद्र चव्हाण म्हणाले, 'मुंबई-गोवा महामार्गाच्या बाबतीत एक बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर ठरवलं की गणपतीच्या अगोदर महामार्ग दुरुस्त व्हावा अशा सूचना दिल्या. सुरुवातीला २ कंत्राटदार होते, नंतर यासाठी १० कंत्राटदार नेमण्यात आले. सर्वांना सूचना दिल्या की, खड्डे लवकर बुजविले पाहिजे. गणेशोत्सवाच्या आधी खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण होईल. काही ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाद्वारे खड्डे बुजवले जात आहेत. काही ठिकाणी खडी डांबर टाकून बुजवले जात आहेत'.

'केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पैसे दिले. मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. काही ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आहेत. यासाठी समन्वयाची गरज आहे. मागच्या सरकारच्या काळात काही ठिकाणी काम केले, तिथे देखील खड्डे पडले आहेत. त्याचं ऑडिट केले जाईल. मी स्वत: कोकणचा आहे. मला देखील या रस्त्याने जायचं आहे. त्यामुळे सर्व जे सूचना सांगतील, ते मी ऐकायला तयार आहे. केंद्र शासनाची किंवा राज्य सरकारच्या चुका नाहीत. तर मागच्या कंत्राटदाराच्या याबाबत चुका आहेत. अनेक कायदेशीर अडचणी आहेत. पाहणी दरम्यान अनेक बाबी लक्षात आल्या आहेत. मी कोणावर टीका करणार नाही', असेही चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

Heart disease symptoms: 'ही' ५ लक्षणं दिसली तर समजा एंजियोप्लास्टी करण्याची आहे गरज; वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

Nanded : विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्हा वगळला; शेतकरी आक्रमक, गांजा लागवड परवानगीची केली मागणी

जबरदस्त! जयस्वालनं वेस्ट इंडीजची केली धुलाई, शतक ठोकलं; जे फक्त सचिन तेंडुलकरला जमलं, ते यशस्वीलाच करता आलं

प्रतिक्षा संपली! म्हाडाच्या ५००० घरांच्या लॉटरीची सोडत उद्या, लिस्ट कुठे अन् कधी पाहता येणार?

SCROLL FOR NEXT