Varsha Gaikwad On Milind Deora Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Politics: मिलिंद देवरा यांचा पक्षाला रामराम! मुंबई काँग्रेस आक्रमक, पक्षविरोधी कारवाईबद्दल २३ सदस्यांचं निलंबन

Varsha Gaikwad On Milind Deora काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर मुंबई काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Varsha Gaikwad On Milind Deora:

काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर मुंबई काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी रविवारी संध्याकाळीच देवरा यांच्यासह शिंदे गटात जाणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे आदेश काढले.

त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह वर्षा गायकवाड यांनी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. विशेष म्हणजे देवरांसारखा बडा नेता जाऊनही ३०० पेक्षा जास्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात गर्दी करत दक्षिण मुंबई अजूनही काँग्रेससोबतच असल्याचं म्हटलं आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिलिंद देवरा यांच्यासोबत दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेविका सुशीबेन शहा, सुनील नरसाळे, रामबच्चन मुरारी, हंसा मारू, अनिता यादव हे माजी नगरसेवक, दक्षिण मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश राऊत आणि अॅड. त्र्यंबक तिवारी यांच्यासह २३ पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या २३ जणांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी रविवारी रात्रीच त्यांचं निलंबन केलं आहे.  (Latest Marathi News)

मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात गर्दी

दक्षिण मुंबईतील एका नेत्याने पक्षत्याग केल्यामुळे काँग्रेस खचेल, ही विरोधकांची समजूत चुकीची असल्याचं सोमवारी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने सिद्ध केलं. सोमवारी सकाळी असलेल्या दक्षिण मुंबईतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठकीसाठी ३५० पेक्षा जास्त जण एकत्र आले होते.

यात आमदार अमीन पटेल, ज्येष्ठ नेते भवरसिंह राजपुरोहित, पालिकेतील माजी विरोधी पक्षेनेते ज्ञानराज निकम, किशन जाधव, अश्फाक सिद्दीकी, पूरन दोशी आदी नेत्यांचा समावेश होता. आम्ही कायम काँग्रेससोबतच आहोत आणि कायम राहू. जे गेले त्यांच्यामुळे पक्षाची ताकद अजिबात कमी होणार नाही. आम्ही जोमाने पक्षवाढीसाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करू, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips : भाजी खूप तिखट झाली? पटकन करा 'हा' उपाय, चव बिघडणार नाही

सुवर्णनगरीत सोन्याचे दर घसरले; दिवाळी पाडव्याला जोडीदारासाठी द्या गिफ्ट ; पाहा आजचा लेटेस्ट भाव

Shocking News : मानवतेला काळिमा! उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स व्यस्थ, VIP प्रोटोकॉलमुळे महिलेचा मृत्यू

MHADA HOME: स्वस्तात घर खरेदीचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडा बांधणार ७ लाख घरं; कोणत्या ठिकाणी किती सदनिका?

Maharashtra Live News Update: बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप..

SCROLL FOR NEXT