Navi Mumbai airport crime  
मुंबई/पुणे

नवी मुंबई विमानतळाजवळ मध्यरात्री भयंकर प्रकार! कॅब चालकाची हैवानियत; महिलेने असा वाचवला जीव

Navi Mumbai airport crime : नवी मुंबई विमानतळाजवळ मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. सुनसान रस्त्यावर कॅब चालकाने महिला प्रवाशासोबत गैरवर्तन करत तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने आरडाओरड करत स्वतःचा जीव वाचवला.

Namdeo Kumbhar

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी:

Navi Mumbai Airport Horror: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सुनसान रस्त्यावर कॅब चालकाने महिला प्रवाशाची छेडछाड करून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने प्रतिकार करत आरडाओरड केल्याने आरोपी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी नवी मुंबई विमानतळ पोलिसांनी मोहम्मद अफजल शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

पीडित महिला आपल्या मित्रांसोबत पार्टीसाठी चेंबूर येथे गेली होती. रात्री परतताना तिच्या एका मित्राने तिच्यासाठी कॅब बुक केली. त्यानंतर महिला कॅबमधून पनवेल येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास कॅब नवी मुंबई विमानतळापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एअरपोर्ट सर्व्हिस रोडवर पोहोचली. तो परिसर पूर्णपणे सुनसान होता. तिथे चालकाने अचानक कॅब थांबवली आणि पाणी पिण्याचे कारण सांगून तो खाली उतरला.

काही वेळाने चालक पुन्हा कॅबमध्ये आला आणि थेट मागील सीटवर बसलेल्या महिलेच्या शेजारी जाऊन बसला. त्याने महिलेचा हात पकडून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिला अत्यंत घाबरली, परंतु तिने धैर्याने जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

ही घटना रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. परिसर सुनसान असल्याने त्यावेळी आसपास कोणीही नव्हते. तरीही महिलेने कसाबसा स्वतःचा बचाव करत कॅबमधून बाहेर सुटका करून घेतली. महिला बाहेर पडताच आरोपी चालक गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला आणि सुरक्षितपणे घर गाठले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नवी मुंबई विमानतळ पोलिसांनी मोहम्मद अफजल शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू असून कॅबच्या माहितीच्या आधारे त्याचा माग काढला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये पावसाने दडी मारल्याने सोयाबीन मातीमोल

Digestion Tips : डाळ-कडधान्यांसोबत चुकूनही हे 6 पदार्थ खाऊ नका! आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Plane Accident : भीषण अपघात! विमान धावपट्टीवरून घसरलं, क्षणात पेट घेतला; ५ जणांचा मृत्यू

Bad cholesterol: फक्त या 6 पदार्थांचा करा दररोजच्या आहारात समावेश; नसांना चिकटलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढतील बाहेर

Haunted Forts : जगातील ५ सर्वात भयानक किल्ले; सूर्यास्तानंतर जिथे पक्षीही फिरकत नाहीत

SCROLL FOR NEXT