MHADA Lottery 2023 Saam TV
मुंबई/पुणे

MHADA Mumbai Lottery 2023: स्वप्नातलं घर सत्यात उतरणार...!; म्हाडाच्या घरांचा फॉर्म भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

Last Day For Mhada Form: म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस; सायंकाळी ६ पर्यंत स्विकारले जाणार ऑनलाईन अर्ज

Ruchika Jadhav

MHADA Lottery 2023: मुंबईत आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. म्हाडाच्या (MHADA) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ४ हजार ८२ सदनिका विक्रीसाठी जाहीर झालेल्या आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. अशात आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. (Latest Marathi News)

विक्रीसाठी असलेल्या संगणकीय सोडत प्रक्रियेला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. १० जुलै ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असून आतापर्यंत सव्वालाख नागरिकांनी अर्ज सादर केला आहे. तर अनामत रक्कम भरलेल्या नागरिकांची संख्या ९८ हजारांवर पोहचली आहे.

सोडत कुठे निघणार?

वांद्रे पश्चिम (Bandra West) येथील रंगशारदा नाट्यगृहात सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त झालेल्या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीचा दिनांक आणि वेळ लवकरच जाहीर केली जाईल. १० जुलै म्हणजेच आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. तसेच रात्री ११:५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT