Mhada Lottery 2024 Thane Saam Tv
मुंबई/पुणे

Mhada Lottery 2024 : ठाण्यात मिळणार फक्त २० लाखांना घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा जबरदस्त धमाका

Mhada Lottery 2024 Thane : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या लॉटरीची तारीख ठरली आहे. सुमारे ७ हजार घरे या लॉटरीत असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढली जाणार आहे.

Satish Daud

तुम्ही जर ठाणे शहरात स्वस्तात घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या लॉटरीची तारीख ठरली आहे. सुमारे ७ हजार घरे या लॉटरीत असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या घरांच्या किमती फक्त २० लाखांपर्यंतच ठेवण्यात आल्या आहेत.

म्हाडाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ८ ऑक्टोबर रोजी योजनेतील ७ हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. यामध्ये म्हाडाला खासगी बिल्डरकडून प्राप्त झालेल्या ९१३ घरांचा समावेळ आहे. ही घरे ठाणे, टिटवाळा तसेच वसई या परिसरातील असणार आहे. अत्यंत कमी किमतीत घरे उपलब्ध करून देण्यात येत असल्याने यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे.

येत्या ३ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील २० टक्के योजनेतील ९१३ घरांची जाहिरात येणार आहे. यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असणार आहे. एकीकडे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या तब्बल २ हजार ३० घरांची लॉटरी ८ ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे म्हाडाने कोकण मंडळाच्या लॉटरीचीही तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, कोकण मंडळाच्या मागील लॉटरीनंतर काही घरे रिक्त राहिली होती. ही घरे आता नव्याने लॉटरीत समाविष्ट करण्याचे काम म्हाडाने सुरु केले आहे. त्यामुळे आतापर्यंतची रिक्त राहिलेल्या घरांचा देखील यात समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बिल्डरांकडील मिळालेली घरे देखील यामध्ये समाविष्ट करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.

'फिल्टरपाड्याचा बच्चन'ला हवंय म्हाडाचे घर!

सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रेटीदेखील म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असून 'फिल्टर पाड्याचा बच्चन' अशी ओळख असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे याने देखील म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला आहे. ज्या पवईतील फिल्टरपाड्यात गौरव लहानाचा मोठा झाला त्याच पवईत त्याने उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज भरला आहे. गौरव मोरेप्रमाणे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' म्हणून घराघरात पोहोचलेल्या निखिल बने याने पहाडी गोरेगाव आणि कन्नमवार नगर येथील घरांसाठी अर्ज भरले आहेत.

देवमाणूस, तू चाल पुढं फेम अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि पुन्हा कर्तव्य आहे फेम अभिनेत्री अक्षया हिंदळकर ह्या पहाडी गोरेगाव येथील घरासाठी इच्छुक आहेत. किशोरी विज, सीमा देशमुख, निपुण धर्माधिकारी, गौतमी देशपांडे यांनी उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज केले आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणत्या कलाकाराचे गृह स्वप्न साकार होईल हे येत्या ८ ऑक्टोबर रोजी कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT