Mhada Lottery  Saam Digital
मुंबई/पुणे

Mhada Lottery : म्हाडाच्या घरांची लॉटरी ८ ऑक्टोबरला, उत्पन्न गटानुसार कमी झाल्या किमती

Mhada house lottery on October 8 : म्हाडाच्या घरांची लॉटरी ८ ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. बहुसंख्य अर्जदारांचे लक्ष किंमत कमी झालेल्या घरांकडे आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : म्हाडाने १ हजार ३० घरांची लॉटरी काढली आहे. यासाठी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्याची माहिती मिळतेय. तर रात्री ११.९९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा देखील करता देणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजत नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लॉटरी काढण्यात येणार आहे.

या लॉटरीमध्ये ३७० घरांच्या किमती १० ते २५ टक्के कमी झाल्याची माहिती मिळतेय. किमती कमी झाल्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला ९ ऑगस्ट रोजी सुरूवात झाली होती. १९ सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत (Mhada house lottery on October) दिलेली आहे.

म्हाडाच्या घरांची लॉटरी

२९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ऑनलाइन यावे, हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत मुदत आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी (Mhada house lottery) ६ वाजेपर्यंत लॉटरीसाठी स्वीकृत अर्जासाठी असलेली अंतिम यादी म्हाडाच्या https://housing, mhada. प्रसिद्ध होणार आहे. लॉटरी आल्यानंतर सोडतीमधील यशस्वी आणि प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची नावे वेबसाइटवर प्रसिद्ध केली जातील.

उत्पन्न गटानुसार कमी झाल्या किमती

अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८, उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरे असल्याची माहिती (Mhada Lottery) मिळत आहे. हाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास आणि प्राधिकरणाने परवडणाऱ्या घरांच्या किमती १० ते २५ टक्क्यापर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण (Mhada Lottery Date) आहे. बहुसंख्य अर्जदारांचे लक्ष किंमत कमी झालेल्या घरांकडे लागलेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT