Mhada Exam: आंदोलन करणारे ABVP चे २५ हुन अधिक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात... Twitter/@ABVPKonkan
मुंबई/पुणे

Mhada Exam: आंदोलन करणारे ABVP चे २५ हुन अधिक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात...

यावेळी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 25 हुन अधिक आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

मुंबई: म्हाडाच्या भरती प्रक्रियेचा पेपर रद्द झाल्यानंतर त्याचाच निषेध करण्यासाठी आज ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विवीयना मॉल येथील नाद बंगल्याच्या बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्याच्या निदर्शनं करण्यात येणार होती. विद्यार्थ्यांनी निदर्शनाला (Agitation) सुरुवात करताच विध्यार्थी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 25 हुन अधिक कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं. आव्हाड यांच्या नाद या बंगल्याच्या बाहेर निदर्शन करण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना अडवल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. (Mhada Exam: More than 25 agitating ABVP activists arrested by police )

हे देखील पहा -

म्हाडाच्या (Mhada) परीक्षा पुढे (Exams Postponed) ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली मध्यरात्री १ वाजून ५४ मिनिटींनी ट्विटरवर व्हिडिओद्वारे दिली होती. म्हाडाच्या व इतर परीक्षा काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षा आता जानेवारीमध्ये होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो असं आव्हाड म्हणाले होते. म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्याने परीक्षा सेंटरवर जाऊ नये, असे जितेंद्र आव्हाड विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UK Politics: मुस्लीम महिला होणार ब्रिटनची PM; कोणाचं नाव आहे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत?

एक मत गेमचेंजर ठरलं; ठाकरेंच्या शिलेदाराचं नशीब उजळलं, भाजपचं गणित बिघडलं

EPFO कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाय; नव्या अ‍ॅपद्वारे निघेल पीएफचा पैसा

Tuesday Horoscope : संपत्तीमध्ये वाढ होईल, दिवसभर आनंदी राहाल; ५ राशींच्या लोकांसाठी मंगळवार गेमचेंजर ठरणार

कारमध्ये डिझेल भरताना अनर्थ घडला; तरण्याताठ्या मुलाचा Heart Attackनं मृत्यू

SCROLL FOR NEXT