Metro7 Update: एप्रिलमध्ये धावणार मुंबई 'मेट्रो 7'; 10 किमीसाठी 'इतकं' असेल तिकीट (पहा Video) Saam TV
मुंबई/पुणे

Metro7 Update: एप्रिलमध्ये धावणार मुंबई 'मेट्रो 7'; 10 किमीसाठी 'इतकं' असेल तिकीट (पहा Video)

लवकरच सुरू होणाऱ्या मुंबई मेट्रो 7 च्या तिकिटाचे दर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आता निश्चित केले आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई: लवकरच सुरू होणाऱ्या मुंबई मेट्रो 7 च्या तिकिटाचे दर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आता निश्चित केले आहे. मुंबई (Mumbai) मेट्रो 7 च्या तिकिटाचे (tickets) किमान दर 10 रुपये असणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास यांनी या विषयी महितु दिली आहे. या मार्गावर फेज १ म्हणजेच दहिसर ते आरे कॉलनी दरम्यानची मेट्रो (Metro) वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. (Metro7 The ticket will be so much for 10 km)

पहा व्हिडिओ-

मेट्रो 7 चे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. मुंबई मेट्रो 7 च्या माध्यमातून प्रवासी वाहतूक (Transportation) सुरू करण्याकरिता आवश्यक असणारे सर्व परवानगी, प्रमाणपत्र मिळणार आहेत. १ महिन्यामध्ये मुंबई मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या फेजमध्ये २० किलोमीटर मार्गावर वाहतूक सुरू करणार असल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली आहे. या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये १५ किमी असणार असून ३५ किमीचा मेट्रो मार्ग आम्ही सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

मेट्रो 2A देखील अंतिम टप्प्यात आहे. 'मुंबई मेट्रो 7' मेट्रो बरोबर या मार्गावर फेज 1 वरील वाहतूक सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’च्या पहिल्या टप्प्याकरिता एकूण १० मेट्रो गाडय़ा वापरण्यात येणार आहेत. या गाड्यांची चाचणी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. तर आता या गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. यामुळे आता या गाड्या प्रवासी क्षमतेसह धावण्याकरिता सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे पहिल्या टप्प्यामध्ये मेट्रोचे व्यवस्थापन आणि मेट्रो चालविण्याची जबाबदारी एक स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे.

MMRDA च्या आधिपत्याखाली असलेल्या या यंत्रणेने आवश्यक त्या मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले असून सेवा देण्याकरिता कर्मचारीवृंद सज्ज झाला आहे. मेट्रो 2 अ' हा १८.५ किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानक राहणार आहेत. मेट्रो-7 मार्गावर १४ स्थानक राहणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT