Malad Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : अल्पवयीन मुलींना अश्लील व्हिडिओ पाठवायचा, पोलिसांनी इंगाच दाखवला

मुलीने नंबर ब्लॉक केल्यास आरोपी दुसऱ्या नंबरवरून व्हिडिओ मेसेज पाठवत असे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Malad :अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज आणि अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्या एका आरोपीला मुंबईच्या मालाड पोलिसांनी अटक केली आहे. हर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 महिन्यांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी अ‍ॅपपद्वारे मुलींचे नंबर काढायचा आणि त्यांना अश्लील मेसेज पाठवायचा. मुलीने नंबर ब्लॉक केल्यास आरोपी दुसऱ्या नंबरवरून व्हिडिओ मेसेज पाठवत असे.

मालाड (Malad) पश्चिम येथील एका अल्पवयीन मुलीला अनोळखी नंबर वरून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ येऊ लागले.त्या अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी मालाड पोलीस (Police) ठाण्यात याबाबत तक्रार केली. 1 नोव्हेंबर रोजी मालाड पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. गुन्हा केल्यानंतर आरोपीने त्याचा नंबर बंद केला होता. परंतु पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून आरोपी

अटक करण्यात आलेल्या आरोपीचा मोबाईल तपासल्यानंतर आरोपीने आणखी अनेक मुलींना अश्लील मेसेज आणि अश्लील व्हिडीओ पाठवल्याचे पोलिसांना समोर आले. यासाठी मालाड पोलिसांचे आवाहन आहे की ज्या मुलींना अश्लील मेसेज आणि व्हिडीओ मिळाले आहेत त्यांनी त्यांच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

SCROLL FOR NEXT