Mumbai Local News Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांनो इथे लक्ष द्या! रेल्वेच्या कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक? पहा वेळापत्रक

Harbour Line Trains Cancelled on Sunday: १२ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगा ब्लॉक. पहा सविस्तर वेळापत्रक.

Bhagyashree Kamble

  • मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक.

  • CSMT ते कल्याण मार्गावर मेगा ब्लॉक नाही.

  • पहा वेळापत्रक.

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक राहणार नाही. रविवारी बहुतांश कामगारांना सुट्टी असते. मात्र, ज्यांना महत्वाच्या कामानिमित्त किंवा फिरायचे असते, ते लोक लोकलमधूनच प्रवास करतात. जर आपण रविवारीही घराबाहेर पडणार असाल, लोकलने प्रवास करणार असाल, तर ही वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा.

रविवार, दिनांक १२.१०.२०२५ रोजी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक राहणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मध्य रेल्वे, मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवार, दिनांक १२.१०.२०२५ मेगा ब्लॉक असणार आहे. रविवारी कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक राहणार आहे. कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील वाहतूक सकाळी ११.१० ते दुपारी १६.१० वाजेपर्यंत बंद राहील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ वाजल्यापासून ते दुपारी १५.३६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१७ वाजल्यापासून ते दुपारी १५.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी या दरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालविण्यात येतील.

ब्लॉकच्या कालावधीत सकाळी १०.०० वाजल्यापासून ते सायंकाळी १८.०० वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याणदरम्यान मुख्य मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक राहणार नाही. दरम्यान, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT