mumbai local train news
mumbai local train news  Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मुंबईत 'या' तारखांना असणार मेगाब्लॉक

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मध्य रेल्वेने ठाकुर्ली आणि दिवा दरम्यानच्या पायाभूत कामासाठी रात्रीचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून (Central Railway) शनिवारी आणि रविवारी रात्रीच्या वेळी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ( Mumbai Mega Block News In Marathi )

या ब्लॉक कालावधित मध्य रेल्वे अप धीम्या मार्गावर, अप आणि डाऊन जलद मार्गावर,अप आणि डाऊन जलद मार्गावर, कल्याण-वसई कॉर्ड लाइनसह ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गावर क्रेन वापरून कोपर रेल्वे स्थानकावरील ६.० मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी गर्डर टाकण्यासाठी रात्रीकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकचा कालावधी येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री ००.३० ते ३.३० वाजता घेण्यात आला आहे.

मेगाब्लॉकमुळे या उपनगरीय गाड्या केल्या रद्द

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.०८, २३.५१, ००.०४ वाजता सुटणारी अंबरनाथसाठीची डाउन मार्गावरील सेवा आणि अंबरनाथ येथून २१.३५, २२.०१ व २२.१५ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठीच्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिताची कोणार्क एक्स्प्रेस कर्जत -पनवेल -दिवा मार्गे वळवली जाईल. कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिवा येथे दुहेरी थांबा दिला जाईल आणि गाडीच्या नियोजित वेळेच्या २० मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी पोहोचल.

ट्रेन क्रमांक 12810 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल कल्याण स्थानकावर नियमन केले जाईल आणि निर्धारित वेळेच्या वेळेस २० मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी पोहोचेल. डाउन मेल/एक्स्प्रेस ट्रेनचे डायव्हर्जन : खालील गाड्या दिवा आणि कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा २० मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी पोहचतील.

1) 11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -अमृतसर एक्सप्रेस २३.३० वाजता.

2) 11041 दादर सेंट्रल - साईनगर शिर्डी एक्सप्रेस ट्रेन २३.५५ वाजता सुटणारी,

3) 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी महानगरी एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.१० सुटणारी.

4)12811 लोकमान्य टिळक टर्मिनस- हाटिया एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.१५ सुटणारी,

5) 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.३५ सुटणारी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

SCROLL FOR NEXT