Mumbai Police arrest accused for throwing red paint on Meenatai Thackeray’s statue at Shivaji Park, Dadar. saamtv
मुंबई/पुणे

मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्याला अटक

Meenatai Thackeray statue : दादर येथील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याबद्दल मुंबई पोलिसांनी उपेंद्र पावसकर यांना अटक केली. या घटनेमुळे राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

Bharat Jadhav

  • दादरमधील शिवाजी पार्कात मीनाताई ठाकरे पुतळ्याची विटंबना.

  • पुतळ्यावर लाल रंग फेकल्याने परिसरात खळबळ.

  • आरोपी उपेंद्र पावसकरला पोलिसांनी अटक केली.

दादरमधील शिवाजी पार्कात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार उपेंद्र पावसकर हा ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ आहे.

उपेंद्र गुणाजी पावसकरने गुन्हा कबूल केलाय. आज सकाळी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ लाल रंग टाकून विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तर दोन्ही ठाकरे बंधूंनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती. हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता.

आरोपीचा धक्का खुलासा

पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने जबाबात धक्कादायक माहिती दिली. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आरोपीने केलाय. दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचे, अशी सूत्रांची माहिती आहे. आता आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. राजकीय नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया देत आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पुतळास्थळाची पाहणी करत २४ तासांत आरोपीला बेड्या ठोका अशा सुचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या होत्या. तर उद्धव ठाकरे यांनीही पाहणी करत पोलिसांना सूचना केल्या होत्या.

हे कृत्य दोन प्रकारचे व्यक्ती करू शकतात. ज्यांना स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटत असेल. अशा लावारिस लोकांनी हे कृत्य केलं असेल. तसेच दुसरं म्हणजे बिहारमध्ये ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा अपमान झाला, म्हणून बिहार बंद करण्याचा एक असफल प्रयत्न झाला. त्याप्रमाणेच हा सर्व प्रकार करुन महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न असेल असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

50 हजार दे नाहीतर दुकान पेटवून देईन, कायद्याच्या बालेकिल्ल्यात पुन्हा गावगुंडांचा उच्छाद|VIDEO

Maharashtra Live News Update : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपमध्ये घराणेशाही; एकाच कुटुंबातील तिघांना उमेदवारी

Masti 4 vs 120 Bahadur Collection : काटे की टक्कर! रितेश देशमुख की फरहान अख्तर पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

Girija Oak Godbole: नॅशनल क्रश गिरिजाचं बीचवर फोटोशूट, PHOTOS पाहा

Why Women Feel Colder : पुरुषांपेक्षा महिलांना जास्त थंडी का वाजते? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT