MBBS Admission Scam Busted  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून ४० विद्यार्थ्यांना कोट्यवधींचा गंडा; पालकांची फसवणूक करणारा महाठग गजाआड

MBBS Admission Scam : एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत ४० विद्यार्थी आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तेलंगणातील महाठगाला पुणे पोलिसांनी अटक केली.

Akshay Badve

MBBS Admission Scam Busted : एमबीबीएस (MBBS) प्रवेशाचे आमिष दाखवून देशभरातील विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या तेलंगणातील एका महाठगाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने बनावट मार्गदर्शन केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांना समुपदेशन (Counseling) देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपये उकळले होते. आदित्यकुमार उर्फ अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीवर यापूर्वीच मुंबई आणि हैदराबाद येथे फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. पुण्यात एका पालकाची ८.२५ लाख रुपयांची फसवणूक झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि हे मोठे रॅकेट उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एका पीडित पालकाने पुण्याच्या येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून तपास करत असताना, आरोपीने पुणे आणि परिसरातील अनेक पालकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी आणि त्याच्या साथीदाराने हैदराबाद येथे ‘एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि.’ नावाची एक बनावट कंपनी स्थापन केली होती. या आरोपींनी पुणे आणि मुंबई येथे विद्यार्थ्यांसाठी 'प्रवेश मार्गदर्शन केंद्र' सुरू केले होते. ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी ५ लाख रुपये, तर खासगी महाविद्यालयांसाठी ३ लाख रुपये 'समुपदेशन फी' म्हणून ते आकारत असत.

दरम्यान, आरोपी अरविंद आरोगोंडा याला काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पवई पोलिसांनी अशाच एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याची रवानगी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. पुण्याच्या येरवडा पोलिसांच्या पथकाने न्यायालयाची परवानगी मिळवून, आरोपीला पुढील तपासासाठी आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल

High Court: आईपासून वेगळं हो, बायकोच्या हट्टाला नवऱ्याकडून नकार, शेवटी कोर्टानेच दिला मोठा निर्णय

Swara Bhasker: 'मी राणी पद्मावतीला भित्री म्हटलं नाही...'; त्या प्रकरणावरून ट्रोल झालेल्या स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक सामाजिक न्याय भवनावर चढले मराठा तरुण

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI चा हा नियम नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT