Pune MBA Exam Paper Leak Saam TV
मुंबई/पुणे

Exam Paper Leak: पेपर फुटीनंतर पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; 'या' तारखेला पुन्हा होणार एमबीएची परीक्षा

Pune MBA Exam Paper Leak: पुणे विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

Satish Daud

Pune University MBA Exam Paper Leak

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पेपरफुटीचं प्रकरण समोर येताच पुणे विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फुटलेला पेपर पुन्हा घेण्यात येईल, असं विद्यापीठाने जाहीर केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात सध्या परीक्षांचं सत्र सुरू आहे.

परीक्षा विभागातर्फे पुणे , अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. २२ डिसेंबर रोजी विद्यापीठातील एमबीए प्रथम वर्ष प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा होती.

मात्र, चिखली येथील डी वाय पाटील येथून प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर विद्यापीठाने ही परीक्षा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच फुटलेल्या विषयाचा पेपर येत्या २६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२.३० पुन्हा घेतला जाणार असल्याचं विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दुसरीकडे, पेपरफुटीप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. तसेच दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT