maval taluka kharedi vikri sangh  saam tv
मुंबई/पुणे

Maval Taluka Kharedi Vikri Sangh Election Result : मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक निकाल; ईश्वर चिठ्ठीने महायुतीच्या उमेदवारास तारलं, कार्यकर्त्यांचा जल्लाेष

Maval Taluka Kharedi Vikri Sangh Election : मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूकीत आम्ही बाजी मारु असा दावा काॅंग्रेसने केला हाेता.

दिलीप कांबळे

Maval News :

मावळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत (maval taluka kharedi vikri sangh election) महायुतीने बाजी मारली आहे. एका जागेसाठी समसमान मतं पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यामुळे महायुतीच्या पदरात ती जागा पडली आहे. त्यामुळेच मावळ तालुक्यातील खरेदी विक्री संघावरती महायुतीची (राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना) एक हाती सत्ता आली. (Maharashtra News)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यामध्ये खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच महायुती म्हणून उमेदवार देण्यात आले हाेते.

यात मावळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत महायुतीने सोळा जागा जिंकल्या. या निवडणूकीत महत्त्वाच्या असलेल्या (अ) गटातील तीन उमेदवारांचा पराभव झाला मात्र शेवटी एक जागा ईश्वर चिट्ठीने महायुतीच्या पदरात पडली. समान मतदान झाल्यामुळे विजयी उमेदवार घोषित करण्यासाठी ईश्वर चिट्ठीची मदत घेण्यात आली.

या प्रक्रियेनंतर महायुतीचे शिवाजी आसवले यांना विजयी घाेषित करण्यात आले. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना महायुतीच्या वतीने महायुती सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला होता. आता मावळ तालुका खरेदी-विक्री संघावर महायुतीचीच एक हाती सत्ता आली आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT