Maval News 
मुंबई/पुणे

Maval News: मावळात फिरण्यासाठी आला अन् पाय घसरून खंडाळ्याच्या दरीत कोसळला; पण सुदैवाने...; पुण्यातील थरारक घटना

Pune News: ट्रेकिंग करताना अनेकदा काहीतरी विपरित घटनाही घडतात. अशीच एक घटना मावळ तालुक्यातून समोर आली आहे.

दिलीप कांबळे

Maval Latest News: ट्रेकिंग करणं अनेक लोकांना आवडतं असत. इतकंच नाही तर अनेक लोक यासाठी अगदी दुरून महाराष्ट्रात येतात. मात्र, ट्रेकिंग करताना अनेकदा काहीतरी विपरित घटनाही घडतात. अशीच एक घटना मावळ तालुक्यातून समोर आली आहे. यात परराज्यातून मावळ तालुक्यातील खंडाळा येथे ट्रेकिंगसाठी येणं एक ट्रेकरच्या जीवावर बेतलं. (Latest Marathi News)

मात्र लोणावळ्यातील (Lonavala) शिवदुर्ग रेस्कु टीम, खोपोलीतील अपघाताग्रस्तनाच्या मदतीची संस्था आणि वन्यजीव मावळ रेस्क्यू टीमने खंडाळ्यात अंधार आणि गर्द झाडीतील खोल दरीत पडलेल्या युवकाचा प्राण वाचविला.

हरिश्चंद्र मंडोल असे ओरिसा राज्यातील आणि आता गोव्यात (Goa) राहत असलेल्या युवकाचे नाव आहे. मात्र दैव बलवत्तर असल्याने त्याचे प्राण वाचले. गोवा येतील एका कंपनीमध्ये सुपरवायझर पोस्ट वरती काम करणारा हरिश्चंद्र निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यातील खंडाळा घाटामध्ये ट्रेकिंग साठी आला होता. (Maval News)

मात्र रस्ता चुकला आणि अंधार झाल्याने त्याचा पाय घसरला त्यामुळे तो खोल दरीमध्ये पडला. इतक्यात खोल दरीत कोसळल्यानंतर तो सुदैवाने एका झाडाला अडकला. तो ज्या रिक्षामधून घाटात फिरण्यासाठी आला होता त्या रिक्षा चालकाशी हरिश्चंद्रने लगेचच संपर्क साधला आणि आपल्याला मदतीची गरज आहे, असं सांगितलं.

रिक्षा चालकाने लोणावळा शहर पोलीस (police) आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमला याची खबर दिली. शिवदुर्गचे कॅप्टन सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्य जीवरक्षक मावळ आणि खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून त्या युवकाला सुखरूप बाहेर काढून लोणावळा पोलिसांच्या स्वाधीन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT