विकास मिरगणे / सचिन कदम | साम टीव्ही
Matheran traffic jam Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीसह लागून आलेल्या विकेंडचा आनंद घेण्यासाठी हिलस्टेशन माथेरानमध्ये दाखल झालेल्या पर्यटकांच्या आनंदावर वाहतूक कोंडीमुळं विरजण पडलं. घाटरस्त्यात दस्तुरी नाका ते वॉटर पाइपपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळं पर्यटकही या वाहतूक कोंडीत अडकून पडले.
स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक माथेरान घाटात पोहोचले. सकाळपासूनच घाटाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत गेली आणि दुपारपर्यंत दस्तुरी नाका येथील वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरून गेला. वाहनतळात जागा मिळेनाशी झाल्यावर पर्यटकांना रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करावी लागली. परिणामी दस्तुरी प्रवेशद्वारापासून घाटातील वॉटर पाईपपुढे जुमापट्टी स्थानकापर्यंत वाहनांच्या नजर पोहोचत नाही तिथपर्यंत रांगा लागल्या. यामुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला.
पर्यटकांचा माथेरानमध्ये पूर (Tourist rush in Matheran Ghat during long weekend)
१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्यानं माथेरानला पर्यटकांचा पूर आला. सकाळपासूनच पर्यटकांचा लोंढा वाढला होता. वाहनांची कासवगती, हॉर्नचा आवाज आणि रस्त्याच्या कडेला झालेली तुफान गर्दी असं चित्र घाटरस्त्यात दिसत होतं. एरवी घाटात शांत असलेलं वातावरण कर्णकर्कश्श झालं. पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याऐवजी गाडीतच तासनतास बसून राहावं लागलं. लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांना विशेष त्रास सहन करावा लागला. तर अनेकांनी उशिरा पोहोचल्यानं नियोजित पर्यटनाचा प्लानच रद्द केला. मुंबई, ठाणे परिसरातील शाळेच्या सहली देखील याठिकाणी आल्या होत्या.
पार्किंग फुल्ल, रस्तेही हाऊसफुल्ल (Parking problem in Matheran hill station)
सकाळपासूनच पर्यटकांची वाहने माथेरान घाटात पोहोचू लागली. बघता बघता पर्यटकांच्या वाहनांचा लोंढा वाढत गेला. तिथली पार्किंग व्यवस्था गच्च भरून गेली. त्यानंतर नाइलाजास्तव पर्यटकांना त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करावी लागली. दस्तुरी ते जुम्मापट्टीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. वाहनतळावर जागा नसल्याने काही पर्यटकांनी तर वाहने जिथे जागा मिळेल तिथे उभी करण्यास सुरुवात केली. परिणामी घाटरस्त्यात वाहनांची आणि पर्यटकांची तुफान गर्दी झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.