Matheran mini train saam tv
मुंबई/पुणे

Matheran mini train: पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! माथेरानची राणी 'या' दिवसापासून पुन्हा धावणार, जाणून घ्या मिनी ट्रेनचं वेळापत्रक

Matheran mini train timings: माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन २० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक, शटल सेवेतील संभाव्य बदल याबाबत जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

विकास मिरगणे, साम टीव्ही | नेरळ

दिवाळी सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत. अशातच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन 20 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह माथेरानकरांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही मिनी ट्रेन नेरळ ते माथेरान आणि माथेरान ते नेरळ अशा मार्गांवर धावणार आहे.

नेरळ ते माथेरान आणि माथेरान ते नेरळ अशा दोन्ही मार्गांवर अप आणि डाऊन फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. या मिनी ट्रेनचे वेळापत्रक कसं असेल ते पाहूयात

नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचं वेळापत्रक

  • नेरळहून सुटणार- माथेरानला पोहोचणार

  • सकाळी ८:५० वाजता- सकाळी ११:३० वाजता

  • सकाळी १०:३० वाजता- दुपारी १:०५ वाजता

माथेरान ते नेरळ मिनी ट्रेनचे वेळापत्रक

  • माथेरानहून सुटणार- नेरळला पोहोचणार

  • दुपारी २:४५ वाजता- संध्याकाळी ५:३० वाजता

  • संध्याकाळी ४:०० वाजता- संध्याकाळी ६:४० वाजता

शटल सेवेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता

मिनी ट्रेन पुन्हा सुरू होणार असल्याने अमन लॉज ते माथेरान या मार्गावर नियमित धावणाऱ्या शटल सेवेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शनिवार आणि रविवारी माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेऊन वीकेंडला मिनी ट्रेनच्या जादा विशेष फेऱ्या चालवण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.

का बंद करण्यात आली होती रेल्वे सेवा?

यंदाच्या पावसाळ्यात नेरळ-माथेरान रेल्वेमार्गावरील अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्याचं समोर आलं होतं. त्यातच २२ सप्टेंबर रोजी कड्याच्या गणपतीकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळली होती. या घटनेमुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि चिखलाचा मलबा साचला होता. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीसमोर मोठा अडथळा निर्माण झाला होता.

रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीची कामं पूर्ण

दरड कोसळल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने मलबा हटवण्याच काम सुरू केलं होतं. युद्धपातळीवर हे काम करण्यात आलं. त्यानंतर रुळांवर साचलेला मलबा पूर्णपणे हटवण्यात आला. त्याचप्रमाणे रेल्वेमार्गावरील आवश्यक दुरुस्तीची कामं देखील पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती आहे.

मलबा हटवण्याचं आणि दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याने मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा अडथळा दूर झालाय. त्यामुळे आता माथेरानची राणी पुन्हा रुळांवर धावण्यासाठी सज्ज झालीये. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांना या मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC चौकशी समितीत नियुक्तीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंनीच केला मोठा खुलासा, काय म्हणाले?

म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी अजूनही करता येणार अर्ज! मुदत वाढली; सोडतीची नवी तारीखही जाहीर

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यासाठी रवाना

Bombay High Court: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

Maharashtra : महाराष्ट्रात FDA ची धडक कारवाई; ७८.४९ कोटींचे अन्नपदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT