mathadi leader shashikant shinde warns cold storage owners morcha at apmc market vashi  saam tv
मुंबई/पुणे

APMC Market Vashi : त्यांनी आमचं ऐकलं नाही तर टाळं लावीन : आमदार शशिकांत शिंदे

Mla Shashikant Shinde : नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आज मोर्चा काढण्यात आला.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

एपीएमसी परिसरात कोल्ड स्टोरेज चालकांनी अनधिकृतपणे सुरू असलेल्या फळांचा व्यापार थांबावा. आत्ता आम्ही त्यांना विनंती करीत आहाेत. त्यांनी अनधिकृतरित्या व्यापार सुरु ठेवल्यास कोल्ड स्टोरेजला कुलुप लावले जाईल असा इशारा माथाडी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे (mla shashikant shinde) यांनी दिला. (Maharashtra News)

मुंबईतून एपीएमसी मार्केट (Agriculture Produce Market Committee) स्थलांतरीत झाले तेव्हा सर्व व्यापार हा एपीएमसी मार्केट मधून होईल असे आश्वासन सरकार तर्फे देण्यात आले होते. नव्या कायद्याचा आधार घेत कोल्ड स्टोरेजमधून फळ विक्री सुरु झाली.

याचा विराेधात करण्यासाठी आज नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माथाडी, मापाडी आणि व्यापारी यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.

आमदार शिंदे म्हणाले नव्या कायद्याचा आधार घेत कोल्ड स्टोरेज चालक इम्पोर्ट केलेल्या फळांचे स्टोरेज करण्याबरोबरच कोल्ड स्टोरेज मधूनच थेट फळांचा व्यापार करत आहेत. याविरोधात अनेक बैठका घेऊन देखील कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आज मोर्चा काढला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्ड स्टोरेज चालकांनी अनधिकृतपणे सुरू असलेल्या फळांचा व्यापार न थांबवल्यास कोल्ड स्टोरेजला टाळ लावण्याचा इशारा यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करा; मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

SCROLL FOR NEXT