मुंबई/पुणे

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Mumbai-Ahmedabad Highway Traffic Block : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिका ५ तास वाहतूक कोंडीत अडकल्याने एका चिमुरड्याचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

रस्त्यांवरील वाहतूक कोंडी जीवघेणी ठरू लागलीय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे १६ महिन्याच्या चिमुरड्याला जीव गमावावा लागलाय. तब्बल ५ तासांपासून रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे लहान मुलाला आपला जीव गमवावा लागलाय.

सकाळपासूनच मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी सुरू होती. संध्याकाळनंतर ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढलीय. तब्बल 20 ते 25 किलोमीटर वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागल्या आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या तसेच गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या अशा दोन्ही लेनवर वाहतुकीचा खोळंबा झालाय.

याच वाहनांमुळे रांगेत रुग्णवाहिका तब्बल ५ तासांपासून अडकली होती. त्यात असलेल्या १६ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय. मुलाचे हालचाल बंद झाल्यामुळे त्याला जवळच्या ससूनव घर गावातील छोट्या रुग्णालयात दाखवण्यात आले होते. त्याचवेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान नायगावच्या चिंचोटी येथील गॅलेक्सी रुग्णालयात या लहान चिमुरड्यांवर उपचार सुरू होते, मात्र डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला मुंबईच्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले होते. त्यामुळे मुलाचे घरचे त्याला हॉस्पिटलमध्ये नेते होते. परंतु वाहतूक कोडींमुळे त्यांची रुग्णवाहिका वाटेत अडकून पडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sawantwadi : सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव बदलले, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता नवं नाव काय?

hotel food cost increase : इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका! खाद्यपदार्थांच्या किंमती १०-१५ टक्क्यांनी वाढल्या, VIDEO

Maharashtra News Live Update: बीड - गेवराईमध्ये घर जळून खाक, कुटुंब देवदर्शनाला गेल्याने जीवितहानी टळली

ना जीम, ना डाएट; फक्त 7 दिवस प्या 'सब्जा आणि तेजपत्ता' ड्रिंक, पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

Actress Mother Death: प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर; हक्काचा माणूस गमावला

SCROLL FOR NEXT