Konkan Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, नवी मुंबईत ५५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Eknath Shinde News : नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. ५५ नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पाडण्यात येत आहे. मुंबई, नवी मुंबई, कोकण, ठाण्यातील ठाकरेंचे अनेक शिवसैनिक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहे. गुरुवारी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना जबरी धक्का दिला. नवी मुंबई आणि ठाण्यामधील ५५ नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे १० नगरसेवक होते. नवी मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनचे फक्त दोन नगरसेवक उरले होते. गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ऐन मनपा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे.

नवी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना जबरी धक्का बसला आहे. १० नगरसेवक आणि शेकडो पदाधिकारी, हजारो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही अनेक नगरसेवेकांनी शिंदेंच्या शिवसेनेत गुरूवारी प्रवेश केला. ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदाश्रमात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार नरेश म्हस्के हे उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव टाकरेंना बसलेला हा मोठा हादरा समजले जात आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे.

खऱ्या शिवसेनेत यांनी प्रवेश केला आहे, त्याचे मनापासून स्वागत करतो. नवी मुंबईतील एकूण ५५ नगरसेवक दाखल झाले आहेत. नवी मुंबईच नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत येत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. नव्या मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत फक्त २ नगरसेवक राहिले आहेत. नवी मुंबई तून खऱ्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. यापुढेही कामाचा वेग तसाच राहणार आहे. नवी मुंबईत महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला यश मिळवायचे आहे, असे शिंदे म्हणाले. दरम्यान, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. त्या टर्ममध्ये मी मुख्यमंत्री होतो आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, कॉमन मॅन अजूनही आहे, असेही सांगायला शिंदे यावेळी विसरले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT