Massive Fire Caught to Building in Mumbai's Malad Area; 14 People Are Injured Saam TV
मुंबई/पुणे

Malad Fire News: मालाडमध्ये ८ मजली इमारतीला भीषण आग; १४ जण घुसमटले, तिघांची प्रकृती चिंताजनक

Mumbai News: Malad Building Caught Fire | मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या एका ८ मजली इमारतीला मंगळवारी (ता.१६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. धुराचे लोळ उठल्याने लहान मुलांसह १४ जणांचा दम घुसमटला.

Satish Daud

Mumbai Malad building Fire News

मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या एका ८ मजली इमारतीला मंगळवारी (ता.१६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आग लागल्याचं कळताच इमारतीतील नागरिकांनी बाहेर धाव घेतली. मात्र, धुराचे लोळ उठल्याने लहान मुलांसह १४ जणांचा दम घुसमटला. यातील ३ जणांची शुद्ध हरपल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. (Mumbai News)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इमारतीत अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दम घुसमटल्याने १४ जण जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. मुंबईतील (Mumbai News) मालाड परिसरात आठ मजली गिरनार गॅलेक्सी निवासी इमारत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास इमारतीच्या मीटर कॅबिनमध्ये अचानक विजेच्या ठिणग्या उडाल्या.

त्यामुळे मीटर कॅबिनला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण इमारतीला विळखा घातला. आग लागल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरु केली. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांनी जीवाच्या आकांताने बाहेर धाव घेतली.

आगीमुळे धुराचे लोळ उठल्याने जवळपास १४ जणांचा दम घुसमटला. काहींची तर शुद्ध देखील हरपली. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जीवाची बाजी लावून इमारतीतील रहिवाशांची सुखरुप सुटका केली. तसेच अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT