Massive Fire Breaks Out At Mumbai's Goregaon Building Saam Tv
मुंबई/पुणे

Goregaon Fire: मुंबईत इमारतीला भीषण आग, काही कुटुंब घरात अडकल्याची भीती

Fire at Mumbai Goregaon Area: मुंबई उपनगरातील गोरेगाव येथील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Fire Breaks Out at Mumbai's Goregaon Area:

मुंबई उपनगरातील गोरेगाव येथील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लागलेल्या इमारतीत काही कुटुंब अडकल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरातील गोरेगाव येथील एका २६ मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. गोरेगाव पश्चिमेकडील एस वी रोड परिसरातील अनमोल टॉवर या उंच इमारतीला ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. एसवी रोड वरील महेश नगर परिसरातील ही इमारत आहे.

या इमारतीत काही कुटुंबे अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आगीची माहिती मिळतात मुंबई अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरु आहे.

अंबरनाथमध्ये कंपनीला भीषण आग

अंबरनाथच्या आनंद नगर एम.आय.डी.सीमध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अंबरनाथमधील कॅनेरा ईंजिनिअरिंग कंपनीला ही भीषण आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अंबरनाथ,बदलापूर आणि एम आय डीसीच्या अग्निशमन दलाचा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहे.

कंपनीत फायबर असल्याने आग भडकत आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान हे वेगवेगळ्या प्रकारे गेल्या दीड तासांपासून आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत. या कंपनीत कुलिंग टॉवर फायब्रिकेशनचे काम होते. या कंपनीला नेमकी आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur News: शेतात काम करताना वीज कोसळली; मायलेकासह मजूराचा मृत्यू

Manoj Jarange: जुन्नरमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष; दोन लाख आंदोलकांसाठी ‘मायेचा घास’ भाकरी-चटणीची मेजवानी|VIDEO

Bhogwe Beach : गणपतीला कोकणात गेलाय, भोगवे समुद्र किनाऱ्यावर मारा फेरफटका

Maharashtra Live News Update: आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर पोलीस बंदोबस्त

BJP Leader: 'आता मृत्यूशिवाय पर्याय नाही...; भाजप नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT