Navi Mumbai Fire  Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai Fire : नवी मुंबईत अग्नितांडव, एनआरआय कॉम्प्लेक्समधील इमारतीला भीषण आग; धडकी भरवणारा VIDEO

Navi Mumbai Fire News : आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

Satish Daud

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

Navi Mumbai Fire News : नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आज सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी आरडाओरड करत बाहेर धाव घेतली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या इमारतीच्या सर्व मजल्यावरील रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच धावपळ होत आहे. आज रविवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा आगीची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्समधील एका इमारतीच्या १७ व्या मजल्यावरील एका प्लॅटला आज सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली.

बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आग लागल्याचं कळताच सर्वत्र आरडाआरोड सुरु झाली. इमारतीतील रहिवाशांनी जीव मुठीत घेऊन बाहेर धाव घेतली. स्थानिकांनी या आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली. आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आग लागलेली इमारत गगनचुंबी असल्याने नवी मुंबई मनपाची ब्रॉनटो गाडी देखील घटनास्थळी दाखल झाली. सध्या अग्निमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, आगीत घर पूर्णत: जळून खाक झालं आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात अर्ज बाद झाल्याची अफवा; फहाद अहमद यांनी केले गंभीर आरोप

Jalgaon News : वडील घराला कडी लावून निघाले अन्‌ घात झाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू

Nandurbar Politics: महायुतीला धक्का, नंदुरबारमध्ये हिना गावित यांची बंडखोरी, शिवसेनेच्या उमेदवाराला देणार टक्कर

VIDEO : 'माझ्या पाठिंब्यासाठी काही लोक पैसे मागताय', मनोज जरांगेंचा आरोप

Motichoor Ladoo Recipe: दिवाळीत लक्ष्मी पूजनाला बनवा घरच्या घरी तोंडात विरघळणारे मोतीचूर लाडू, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT