Car Garage Fire
Car Garage Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Fire At Car Garage : अंबरनाथमध्ये कारच्या गॅरेजला भीषण आग; ८ ते १० गाड्या आगीच्या भक्षस्थानी

अजय दुधाणे

Ambernath News : अंबरनाथमध्ये एका कारच्या गॅरेजला आज (१ मर्च) सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गॅरेज संपूर्णपणे जळून खाक झालं असून गॅरेजमधील ८ ते १० गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.

अंबरनाथमधून (Ambernath) बदलापूरकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गाला लागून चिखलोली डीमार्टच्या जवळ ऑटोक्राफ्ट नावाचं कारचं गॅरेज आहे. या गॅरेजला आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. यावेळी तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी फायर एक्सटिंग्विशरच्या मदतीने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, गॅरेजमधील सीएनजी गाड्यांचे स्फोट होऊ लागल्यामुळे ही आग आटोक्याबाहेर गेली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केलं. या आगीत हे गॅरेज संपूर्णपणे जळून खाक झालंय. तर गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या ११ गाड्यांपैकी जवळपास ८ ते १० गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.

या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ बदलापूर (Badlapur) यासह एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांच्या सहाय्याने तब्बल दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. या आगीत जीवितहानी झालेली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागलेली नसून कुणीतरी जाणीवपूर्वक लावली असल्याचा संशय गॅरेजच्या मालकांनी व्यक्त केल्याची माहिती अंबरनाथचे मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे. तसंच या दृष्टीने पुढील तपास केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT