Explosion in Chemical company: Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri Chichwad: सोळू गावातील कंपनी परिसरात भीषण स्फोट; १ जणांचा मृत्यू तर ९ जण जखमी

Explosion in Chemical company: कंपनीत केमिकलने भरलेल्या ड्रमचां स्फोट झाला आणि त्यानंतर कंपनीला लागून असलेल्या महावितरच्या डिपीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, त्यातून निघालेल्या आगीच्या धुराचे लोट आकाशात पसरले होते.

Bharat Jadhav

Pimpri Chichwad Explosion in Chemical company:

पिंपरी-चिंचवड नजीक असलेल्या खेड तालुक्यातील सोळु गावात एका कंपनी परिसरात स्फोट झाल्याची घटना घडलीय. या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला तर ८ ते ९ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की, या स्फोटामुळे परिसरातील घरांना तडे गेले तर रस्त्यावरील वाहने जळून खाक झाली आहेत.(Latest News)

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, आधी कंपनीत केमिकलने भरलेल्या ड्रमचां स्फोट झाला आणि त्यानंतर कंपनीला लागून असलेल्या महावितरच्या डिपीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, त्यातून निघालेल्या आगीच्या धुराचे लोट आकाशात पसरले होते. तर कंपनी लगतच्या अनेक घरांना तडे गेले. तर रस्त्यावर उभी असलेली अनेक वाहने देखील जळून खाक झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर स्फोट नेमका कशाचा झाला याचा ते शोध घेण्यात येत आहे. दरम्यान संबधित कंपनी राजकीय व्यक्तीची असल्याची चर्चादेखील नागरिक करू लागलेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिस या घटनेचा तपास करून दोषींना गजाआड करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. ही कंपनी मागील तीन चार वर्षापासून बंद असल्याची आहे. एनसीआरटीमध्ये कंपनीविषयी प्रकरण सुरू आहे. त्याची एक नोटीस गेटवर आढळून आल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलीय पोलिसांनी दिलीय. कंपनीच्या आतील कार्यालये बंद असून त्या मागील डीपी आहे, त्याचा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीत आधी स्फोट झालं आहे की डीपीचा स्फोट झाला याचा तपास केला जाणार आहे. फॉरेन्सिक टीम येथे दाखल झाले असल्याची माहिती पवार यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT