mumbai ahmedabad national highway saam tv
मुंबई/पुणे

Palghar News : अखिल भारतीय किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दीड तास राेखला मुंबई- अहमदाबाद महामार्ग

Rasta Roko Andolan : या रास्ता रोकोमुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

रुपेश पाटील

Mumbai Ahmedabad National Highway : वनपट्ट्यांसह विविध बावीस मागण्यांच्या पुर्ततेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने आज (मंगळवार) मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. हे आंदाेलन तब्बल दीड तास डहाणूतील चारोटी येथे हजारो माकपाच्या कार्यकर्त्यांनी छेडले. (Maharashtra News)

देशात वाढत चाललेली बेरोजगारी, वनपट्ट्या संबंधीचे प्रश्न, केंद्राच्या वाढवण बंदराला विरोध , देशात आणि राज्यात वाढत चाललेले महिला अत्याचार या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आज एल्गार पुकारला. या रास्ता रोकोमुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार विरोधात आक्रमक झालेल्या अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या 20 हजार पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पालघर मधील चारोटी येथे दीड तास रोखून धरला.

यावेळी रास्ता रोको करत कार्यकर्त्यांनी मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार विरोधातजोरदार घोषणाबाजी केली. केंद्र आणि राज्य सरकारकडे वारंवार मागणी करून ही सरकार दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याच यावेळी आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आलं.

अखिल भारतीय किसान सभेचे अशोक ढवळे , मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली या रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी आमदार विनोद निकोले, अशोक ढवळे तसेच उदय नारकर यांच्यासह आंदाेलकांनी (aandolan) मागण्या मान्य न झाल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT