ekta sawant shawarma girl  Saam tv
मुंबई/पुणे

'त्या' मराठी तरुणीचा शोरमा व्यवसाय पुन्हा सुरू; स्टॉलला लावला राज ठाकरेंचा फोटो

ekta sawant shawarma girl : डोंबिवलीतील त्या मराठी तरुणीने शोरमा व्यवसाय पुन्हा सुरू केला. तिने यंदा स्टॉलला राज ठाकरेंचा फोटो लावला.

Vishal Gangurde

मराठी तरुणीचा शोरमा व्यवसाय पुन्हा सुरू

डोंबिवलीतील एकता सावंतने स्टॉलवर राज ठाकरे यांचा फोटो लावला

मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्टॉलला भेट देत दिला पाठिंबा

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

केडीएमसीच्या कारवाईनंतर चर्चेत आलेला मराठी तरुणीचा शोरमा व्यवसाय पुन्हा एकदा डोंबिवलीत सुरू होत आहे. मराठी तरुणी एकता सावंत हिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो लावून शोरमाचा स्टॉल उभारला आहे. व्यवसाय सुरू करण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत येऊन एकता सावंतच्या शोरमा स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अविनाश जाधव म्हणाले की, २०१७ साली आम्ही वारंवार ओरडून सांगत होतो की १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांवर बंदी घाला. मात्र पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने आमचे ऐकले नाही. आज २०२६ उजाडले तरी परिस्थिती जैसे थेच आहे.

ते पुढे म्हणाले की, सर्वांनी नियम पाळावेत, त्यानंतर आम्हीही नियम पाळू. नियम सर्वांसाठी समान आहेत, मग केवळ या मराठी तरुणीवरच बंदी का घातली जाते?असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला.

केडीएमसीने या स्टॉलवर कारवाई केल्यास २०१७ ते २०२६ या कालावधीत महापालिकेने नेमकी किती फेरीवाल्यांवर कारवाई केली, याची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणीही अविनाश जाधव यांनी यावेळी केली. मराठी तरुणीने स्वबळावर उभा केलेला व्यवसाय आणि त्याला मिळणारा मनसेचा पाठिंबा यामुळे हा विषय पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या कारवाईबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून पुढे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

SCROLL FOR NEXT