Marathi Vs Hindi Clash Viral Video In Local Ladies Compartment X
मुंबई/पुणे

Video Viral : '...नाहीतर निघा बाहेर!' मुंबई लोकलमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद टोकाला, ट्रेनच्या डब्यात महिलांमध्ये जुंपली

Marathi Vs Hindi : मराठी विरुद्ध हिंदी वाद मुंबईच्या लोकलमध्ये पोहोचला असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रेनच्या एका महिला कोचमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला मराठी-हिंदी या मुद्यावरुन भांडत आहेत.

Yash Shirke

Marathi Vs Hindi Clash : मराठी विरुद्ध हिंदी हा वाद आता लोकल ट्रेनच्या महिला कोचपर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनच्या महिला कोचमध्ये महिलांमध्ये मराठी विरुद्ध हिंदी यावरुन जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. महिलांच्या भांडणाची सुरुवात कोचमधील सीटवरुन झाली. पण नंतर त्याचे रुपांतर भाषेच्या वादात झाले.

मुंबईत राहायचं असेल, तर मराठीत बोलायचं!

लोकल ट्रेनमधील व्हायरल व्हिडीओमध्ये महिलांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळते. व्हिडीओच्या सुरुवातीलाच एक महिला 'महाराष्ट्रात, मुंबईत राहताय ना तुम्ही,.. मुंबईत राहायचं असेल, तर मराठीत बोला नाहीतर निघा बाहेर' असे म्हणते. डब्यातील अन्य महिला देखील या मराठी विरुद्ध हिंदी वादात सामील झाल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते. या एकूण प्रकरणामुळे मराठी विरुद्ध हिंदी वाद वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मराठी विरुद्ध हिंदी हा वाद सुरु आहे. राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली. हिंदीच्या सक्तीवरुन राज्यभरात नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात आला. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या विरोधी पक्षातील नेत्यांनी हिंदी सक्तीच्या निर्णयावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. वाढत्या विरोधामुळे सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला.

याचदरम्यान मीरारोड-भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटला. या परिसरातील काही व्यापाऱ्यांनी मराठी भाषिकांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी मीरारोड-भाईंदरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या एकूण प्रकरणामुळे सध्या राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणाऱ्या त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचे येणार अच्छे दिन; तीन ग्रहांमुळे मिळणार

Mental Health : रील्स स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे मेंदूवर होणारे पाच घातक परिणाम

Karuna Munde : धनंजय मुंडेंचे मुंबईत ३ फ्लॅट, पण मुक्काम मात्र सरकारी बंगल्यावर, करूणा मुंडे अन् अंजली दमानियांचा गंभीर आरोप

ध्वाजारोहणास छगन भुजबळांचा नकार, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, महायुतीत नेमकं काय सुरू?

SCROLL FOR NEXT