Death News AI PHOTO
मुंबई/पुणे

Death News : काळाचा घाला! मुंबई-गोवा महामार्गावर प्रसिद्ध मराठी कवयित्रीचं अपघाती निधन, साहित्यविश्वावर शोककळा

Marathi Poet Death In Accident : मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात प्रसिद्ध मराठी कवयित्रीचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे मराठी साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कलाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कवयित्रीच्या निधनाने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. असोलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानंतर साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. कवयित्रीच्या साहित्यिक योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव ओटाव फाट्याजवळ सोमवारी सकाळी झालेल्या एका अपघातात सावंतवाडी येथील प्राध्यापिका आणि प्रसिद्ध कवयित्री डॉ. शरायू असोलकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात त्यांचा भाऊ वैभव असोलकर गंभीर जखमी झाला आहे.

दोघे रत्नागिरीहून सावंतवाडीतील आपल्या घरी परतत होते. महामार्गावर अचानक आलेल्या एका गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी वळवताना वैभवचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे कार महामार्गाच्या दुभाजकावर आदळली आणि हा भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्याला अपघाताची सूचना दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने कणकवलीला नेण्यात आले.

डॉ.शरयू असोलकर या संत राऊळ महाराज महाविद्यालय-कुडाळ येथील मराठी विभागप्रमुख होत्या. त्यांच्या ‘तुटलेपण बांधून घेताना’ या प्रसिद्ध कविता संग्रहाला पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या कविता काळजात घर करून राहिल्या. डॉ.शरयू असोलकर यांच्या आकस्मिक निधनाने शैक्षणिक, कला आणि साहित्यिक या समाजात पोकळी निर्माण झाली आहे. ज्येष्ठ कवयित्रीच्या निधनाची बातमी समजताच कला, साहित्य क्षेत्रातील मंडळींनी, चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचे टेन्शन वाढणार, सातही धरणातील पाणीसाठ्यात घट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 18 हजारांचा पगार थेट 69 हजार होणार? वाचा अपडेट्स

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये गावगुंडाची दहशत; दुचाकीस्वारावर कोयत्याने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद

Kothimbir Cream Soup: हिवाळ्यात घ्या गरमागरम कोथिंबीर क्रीम सूपचा आस्वाद; घरी बनवा रेस्टॉरंटसारखे चविष्ट सूप!

Kidney Damage : तुम्ही वरवर दिसायला एकदम फिट दिसता, पण 'या' ७ दररोजच्या वाईट सवयी ठरतात किडनीसाठी धोकादायक

SCROLL FOR NEXT