Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! 'त्या' १२ नावांचा पत्ता कट; मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांना पाठवणार नवी यादी

शिंदे-फडणवीस सरकार आता १२ नव्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार सत्तेत येऊन दोन महिने उलटली. काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. आता चर्चा विधान परिषदेच्या त्या १२ नावांच्या यादीची सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते, त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ नावांची यादी राज्यपाल यांना दिली होती. मात्र, राज्यपाल यांनी अजूनही त्या यादीला मंजूरी दिलेली नाही. आता नव्या सरकारमुळे पुन्हा ती यादी चर्चेत आली आहे.

शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार आता १२ नव्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे. जुनी यादी रद्द समजावी असं पत्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे. महविकास आघडी सरकारने २०२० मध्ये नाव पाठवली होती, पण राज्यपालांनी ती नाव मंजूर न केल्याने विधान परिषदेतील बारा जागा रिक्त आहेत.

आता या १२ जागांवर नवी नावे सुचवण्यात येणार आहेत. जुन्या नावांची यादी रद्द समजावी असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज भवनला पाठवले आहे. या नावांवर अंतिम चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीची लटकवलेली 12 नावे राज्यपाल आता कशी स्विकारणार याचीच जास्त चर्चा सुरु आहे. तसेच शिंदे-फडणवीसांकडे १२ नावांसाठी कितीतरी पटीने इच्छुकांची संख्या आहे. या १२ नावांसाठी अनेक नेत्यांनी लॅाबिंग देखील सुरु केली आहे. त्यामुळे आता या यादीत कोणाचा समावेश होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हे देखील पाहा

सध्या आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. आता या १२ नावांमध्ये नेमकी कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी दिली जाऊ शकते, असंही बोलले जात आहे. (Eknath Shinde Latest News)

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT