Marathi compulsory rule controversy for auto and taxi drivers in Mumbai saam tv
मुंबई/पुणे

1 वर्षाची मुदतवाढ, भैय्यांच्या मुजोरीत वाढच मुदतवाढीनंतर परप्रांतीय रिक्षाचालकांचा जल्लोष

One-Year Extension Triggers Celebration: मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर भैय्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी मराठी सक्तीच्या मोहिमेवर मीठ चोळलंय. नेमकं कोणतं संतापजनक कृत्य परप्रांतीयांनी केलंय? मनसेनं त्यावर काय इशारा दिलाय? पाहूयात हा रिपोर्ट......

Suprim Maskar

परप्रांतीय रिक्षाचालकांचा हा व्हिडिओ नीट बघा...मुख्य़मंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी भैय्यांना मुदतवाढ दिल्यानंतर अवघ्या काही तासात आरे कॉलनीत भैय्यांनी भाजपप्रणित कामगार आघाडीच्या नेत्यांसोबत हा जल्लोष केलाय.. मराठी शिकण्यासाठी आढेवेढे घेणारे हेच परप्रांतीय मुदतवाढीनंतर जल्लोषात मोठ्या संख्येनं उपस्थित झाले आणि थेट मराठीसक्तीच्या निर्णयाचीच लाज निघाली...जल्लोषात सहभागी झालेले परप्रांतीय रिक्षाचालक नेमकं काय म्हणाले तेही ऐका...

राज्य सरकारने रिक्षांच्या मुदतवाढीबाबत घेतलेल्या निर्णयावर मनसे आक्रमक झालीय... या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी मनसेनं सुरू केली आहे... तसंच राज ठाकरेंचा आदेश आल्यास, रस्त्यावर उतरलेल्या रिक्षावाल्यांच्या घरात घुसून मारू असा सज्जड दम मनसेनं दिलाय. तर मनसेला जशास तसं उत्तर देणार असल्याचा पलटवार परप्रांतीय रिक्षाचालकांनी केला.

मुदतवाढीमुळे परप्रांतीयांना दिलासा मिळाला असला तरी मराठी सक्तीच्या मोहिमेला मात्र ब्रेक लागलाय. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी या मुदतवाढीचा मराठी शिकण्यासाठी सुदपयोग करावा. मुदतवाढ मिळाली म्हणून अशा जल्लोष आणि नाचगाण्याच्या कार्यक्रमातून उगाचंच मुजोरी दाखवून मराठी माणासाच्या जखमेवर मीठ चोळण्याची गरज नाही. हे असे कार्यक्रम म्हणजे वादाला निमंत्रणच आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांनीही याचं राजकारण न करता चालकांना योग्य सल्ला देण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भेटीगाठींचं राजकारण, सतेज पाटील-भाजप नेत्यांच्या भेटीने समीकरणं बदलणार?

बोगस मतदार, बोगस SIR; झेरॉक्स सेंटरवर हजारो SIR फॉर्म्स?

Fact Check: आधार कार्डवर मिळणार 3 लाखांचं कर्ज? कर्ज घेण्यासाठी केंद्र सरकारची नवी योजना?

मनोज जरांगे 'वर्षा'वर धडकणार; 40 लाख गाड्या, 6 कोटी मराठे मुंबईत येणार

बदलीचा सपाटा! 6 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT