Mumbai MNS Action Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: 'मराठी गया तेल लगाने' परप्रांतीय सुरक्षारक्षकाची मुजोरी, मनसैनिकांनी दिला चोप; VIDEO

MNS Action: मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. पवईमधील एल अँड टी कंपनीमधील सुरक्षारक्षकाने मराठी भाषेचा अपमान केला. या सुरक्षारक्षकाला मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला.

Priya More

संजय गडदे, मुंबई

महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्याच्या मुद्यावरून अनेकदा वाद निर्माण झाल्याच्या घटना सतत समोर येत आहेत. चारकोपमधील एअरटेल गॅलरी येथे काम करणाऱ्या महिला कर्मचारीने मराठीत बोलण्यास नकार देण्याचा प्रकार तसेच वर्सोवा येथील डी मार्टमधील कर्मचाऱ्याकडून 'मुझे मराठी आती नही मै हिंदी बोलुंगा' असे म्हणत वाद झाल्याचे प्रकार त्याचे असतानाच आता मुंबईत असाच आणखी एक प्रकार घडला आहे. मराठी न बोलणाऱ्या सुरक्षारक्षकाला मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे.

मुंबईतील पवई येथे असणाऱ्या एल अँड टी कंपनीतील सुरक्षारक्षकाने मराठी भाषेविषयी अपमानजनक वक्तव्य केले. मला मराठी येत नाही असं म्हणत 'मराठी गया तेल लगाने'असं वक्तव्य या सुरक्षारक्षकाने केले. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि तरुणामध्ये वाद झाला. सुरक्षारक्षकाने मराठीत बोलावे असा आग्रह तरुणाने धरला. पण 'मुझे मराठी आती नही हिंदी बोलता हू मराठी गया तेल लगाने' असे मराठी भाषेविषयी अपमानजनक वक्तव्य सुरक्षारक्षकाने केले. त्याच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या वादात मनसेने उडी घेत सुरक्षारक्षकाला कानशिलात लगावताच त्या सुरक्षारक्षकाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठी माणसाची माफी मागितली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. मराठी भाषेचा वापर करण्याचा त्यांनी आग्रह धरला. मराठी बोलला नाही तर कानफटीतच बसणार, असा सणसणीत इशारा राज ठाके यांनी दिला. त्यानंतर मनसैनिक कामाला लागले. मराठी न बोलणाऱ्यांना परप्रांतीयांना मनसैनिकांकडून चोप देण्यास सुरूवात केली आहे. मराठीचा अपमान करणारे आता मनसैनिकांच्या रडारवर आहेत. बँक, रेल्वे स्टेशन, सरकारी आस्थापनांमध्ये मराठीचा वापर करण्याचा आग्रह मनसेकडून धरण्यात आला आहे. मराठीचा वापर जर केला नाही तर खळखट्याक करण्याचा इशारा मनसैनिकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT