Maratha Reservation  Saam tv
मुंबई/पुणे

सरकार अॅक्शन मोडमध्ये, पोलिसांकडून मनोज जरांगेंना नोटीस; रेल्वेकडूनही मराठा आंदोलकांना महत्वाच्या सूचना, वाचा

Maratha Reservation Update : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. पोलिसांनंतर रेल्वेकडूनही मराठा आंदोलकांना महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

Vishal Gangurde

मनोज जरांगे यांना आझाद मैदानात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची नोटीस

सीएसएमटी रेल्वे स्टेशन परिसरात आंदोलकांचा मुक्काम

रेल्वे प्रशासनाने आंदोलकांसाठी महत्वाच्या सूचना जारी

आंदोलकांना महिलांच्या आणि राखीव डब्यांपासून दूर राहण्याचे आवाहन

मुंबई : मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गेल्या ५ दिवसांपासून मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात ठाण मांडलं आहे. आझाद मैदानात मोठ्या संख्येने मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर मुक्काम ठोकला आहे. सीएसएमटी परिसरात थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून नियमांचं उल्लंघन होत असल्याचं कोर्टाच्या निर्दशनास आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान खाली करण्याचे आदेश दिले आहेत. तर रेल्वे प्रशासनाकडूनही मराठा आंदोलकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. आझाद मैदान परिसरात उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. या नोटिशीनंतर मनोज जरांगे यांना आझाद मैदान रिकामे करावं लागणार आहे. पोलिसांच्या नोटिशीनंतरही मनोज जरांगे काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने मराठा आंदोलकांना महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात मराठा आंदोलकांनी त्यांच्या मागण्या शांततेत आणि लोकशाही पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर मराठा आंदोलकांनी वयोवृद्ध, दिव्यांग प्रवाशांसाठी अडचण होणार नाही. त्रास होणार नाही याची दक्षता घेत मार्ग मोकळा करून देण्याच्याही सूचना दिल्या आहेत. आझाद मैदानाकडे जाण्यासाठी जाणाऱ्या भुयारी मार्गाचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.

महिलांच्या डब्यातून किंवा राखीव डब्यातून मराठा बांधवांनी प्रवास करू नये अशा सूचनाही आंदोलकांना रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासन करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाच्या सूचनेनंतर मराठा आंदोलक नियमांचं पालन करतात का, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dupatta Draping Styles: गरब्याला लेहेंग्यासोबत ओढणी कशी करायची स्टाईल जाणून घ्या सोपी पद्धत?

Pak vs Ban : पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशनं उतरवली तगडी टीम, ३ बदल केले; जिंकणार तो थेट भारताविरुद्ध फायनल खेळणार

Central Government: राज्यावर पुराचं संकट; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

Men Periods: पुरुषांनाही मासिक पाळी येते का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Shocking : महापालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे तरुणाची आत्महत्या; ४ महिन्याचं बाळ झालं पोरकं

SCROLL FOR NEXT