Maratha Reservation Protest Bombay High Court Issues Stern Warning Saam tv news
मुंबई/पुणे

३ वाजेपर्यंत मैदान खाली करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर.. हाय कोर्टाचा मराठा आंदोलकांना थेट इशारा

High Court Warns Maratha Protesters: मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलकांना दुपारी ३ वाजेपर्यंत जागा खाली करण्याचा आदेश दिला. कोर्टानं स्पष्ट केलं की आदेश पाळला नाही तर कठोर पावलं उचलली जातील.

Bhagyashree Kamble

  • मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलकांना दुपारी ३ वाजेपर्यंत जागा खाली करण्याचा आदेश दिला.

  • कोर्टानं स्पष्ट केलं की आदेश पाळला नाही तर कठोर पावलं उचलली जातील.

  • मनोज जरांगे पाटील यांनी 'मेलो तरी मागे हटणार नाही' असं जाहीर केलं.

  • पोलिसांनीही आंदोलकांना नोटीस बजावून आझाद मैदान रिकामं करण्यास सांगितलं.

मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मराठा आंदोलकांचा आज पाचवा दिवस. काल मराठा आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेविरोधात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टानं राज्य सरकारला काही निर्देश दिले होते. तसेच आंदोलकांनाही काही सुचना दिल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. यावेळी कोर्टानं मराठा आंदोलकांना गंभीर इशारा दिला आहे. 'आज दुपारी ३ वाजेपर्यंत जागा खाली करा आणि आम्हाला कळवा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून काम करु', असा थेट इशारा कोर्टानं आंदोलकांना दिला आहे.

कोर्टानं काल राज्य सरकारला काही निर्देश दिले. आज मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटीस बजावली. या नोटीशीत त्यांनी आंदोलकांना आझाद मैदान खाली करण्यास सांगितले. आज कोर्टानंही ३ वाजेपर्यंत आंदोलकांना वेळ दिला आहे. ३ वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्यास सांगितले आहे.

'आज दुपारी ३ वाजेपर्यंत जागा खाली करा आणि आम्हाला कळवा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून काम करु', असा गंभीर इशारा कोर्टाने दिला आहे. 'कोर्टात जे सादर केलेलं आहे ते आम्ही पाहिलं, जे धक्कादायक आहे. यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत', असे न्यायमूर्ती म्हणाले.

दुपारी तीन वाजता सुनावणी होणार

'३ वाजेपर्यंत मुंबई खाली करा, अन्यथा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. जे सुरू आहे, ते बेकायदेशीर आहे'. असे मत कोर्टानं नोंदवले आहे. 'शाळा, ॲाफीस आणि सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाल्याचं आम्हाला दिसून येतंय. मुंबईवर परिणाम झालाय. दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई सुरळीत व्हायला हवी. याबाबतची सुनावणी आज दुपारी तीन वाजता होणार आहे'. राज्य सरकार आणि आंदोलकांना कोर्टाने दुपारी तीन वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbra Railway Station : 'मुंब्रा' स्टेशनचे नाव अज्ञाताने अचानक बदलले, स्टेशनच्या फलकावर लावले दुसरे नाव

छगन भुजबळांचा कौतुकास्पद निर्णय, शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा, २८७ आमदारांनी घ्यावा आदर्श

Parbhani Heavy Rain : परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार; शेताला आले नदीचे स्वरूप, होत्याचं नव्हतं झाले

Korigad Fort History: ट्रेकिंग, निसर्ग आणि युद्धनीती; कोरीगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

SCROLL FOR NEXT