Manoj Jarange Patil Over Maratha Reservation Saam Tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा इशारा, सरकार अलर्ट मोडवर; ३ कॅबिनेट मंत्री अन् १ आमदार आज अंतरवाली सराटीत

Mumbai Maratha Protest Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. २९ ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेला महत्त्व.

Alisha Khedekar

  • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

  • जारांगेंचा २९ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा

  • अंतरवाली सराटीत तयारीला वेग

  • आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी आणि व्यवस्थेचा आढावा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असताना सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई आणि आमदार प्रसाद लाड हे अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत आज सकाळी साडेअकराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचणार असून, त्यानंतर ते थेट अंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत. दुपारी एकच्या सुमारास ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर नेतेही या चर्चेत सहभागी होणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याची तयारी सुरू असून, मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबईत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारकडून जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानाचीही पाहणी करण्यात आली आहे. मागील आंदोलनावेळी पावसामुळे निर्माण झालेला चिखल, व्यासपीठाची जागा आणि माध्यम प्रतिनिधींसाठी उपलब्ध जागेची कमतरता यांसारख्या अडचणी लक्षात घेऊन यंदा विशेष नियोजन केले जात आहे. आंदोलकांच्या येण्या-जाण्याच्या मार्गाचीही चाचपणी करण्यात आली आहे.

दुसरीकडे अंतरवाली सराटीतही आंदोलनाची तयारी वेगाने सुरू आहे. गोदाकाठच्या १२३ गावांतील समाजबांधवांची बैठक घेऊन आंदोलनासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आंदोलकांसाठी अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येक घरातून एक स्वयंसेवक सहभागी व्हावा, तसेच आंदोलनस्थळी सकाळ-संध्याकाळ भाकरी पाठवाव्यात, अशा सूचना जरांगे पाटील यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चेतून तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT