Maratha Reservation  Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation Breaking : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी! पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात; सूत्रांची माहिती

Maratha Andolan for Reservation : सध्या समितीकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूरज सावंत

Kunbi Pramanpatra for Reservation:

राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

समितीकडे उपलब्ध असलेल्या डेटानुसार सरकार तत्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करणार आहे. सध्या समितीकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत. आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.

'मंत्र्यांना बाहेर पडू देणार नाही'

पंढरपूर: मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत उपसमितीची बैठक सुरू असतानाच, मराठा क्रांती मोर्चानं सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. या बैठकीत निर्णय घ्या, अन्यथा मंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिला आहे.

राज्य सरकारने बैठकांचा फार्स न करता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अन्यथा एकाही मंत्र्याला घराबाहेर पडू देणार नाही, असे साखळकर म्हणाले.

श्रीकांत शिंदे, दादा भुसेंचा नाशिक दौरा रद्द

नाशिक: मराठा समजाच्या भावनांचा आदर करत खासदार श्रीकांत शिंदे आणि दादा भुसे यांचा नाशिक दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला शिंदे आणि दादा भुसे प्रमुख पाहुणे म्हणून जाणार होते.

शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारखान्याच्या गळीत हंगामाच्या निमित्ताने कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार होते. मराठा समाज बांधवांनी गावबंदी केल्याने स्वतः हेमंत गोडसे, दादा भुसे आणि श्रीकांत शिंदे ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत कार्यक्रमाला जाणार नाहीत, असे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवणार? नाचक्की टाळण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय, VIDEO

SCROLL FOR NEXT