Maratha Aarakshan Bill Approved in Maharashtra Vishesh Adhiveshan | Saam TV Marathi News Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Aarakshan News : मोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

Maratha Reservation Bill Approved in Maharashtra Vishesh Adhiveshan: मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १०-१० आरक्षणाला मंजुरी देण्यात आलं आहे.

प्रविण वाकचौरे

Maratha Aarkashan Bill Approved:

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठा लढा देणाऱ्या मराठा बांधवांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. मराठा समाजासाठीच्या आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी मिळाली आहे. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १०-१० आरक्षणाला मंजुरी देण्यात आलं आहे.

मराठा आरक्षणासाठी सरकारनं राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावलं होतं. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हे विधेयक मांडलं. आवाजी मतदानाने या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य सरकारने आज, मंगळवारी बोलावलेल्या राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाची तरतूद असणारे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडले.

 मराठा आरक्षणासाठीच्या विधेयकाला सत्ताधारी आणि विरोधी बाकावरच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. आता हे विधेयक विधानपरिषदेत मांडण्यात येईल. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर ते राज्यपालांकडे स्वाक्षरीकरिता पाठवण्यात येईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मराठा आरक्षणासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असून आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी सरकारकडून विशेष खबरदारी देखील घेतली जाणार आहे. आधीच्या त्रुटी दूर करून आम्ही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत नक्कीच टिकणार, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला आहे.

ओबीसी बांधव असो, किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शैक्षणिक, आणि नोकरीतले आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपतींच्या आशीर्वादाने, संपूर्ण मराठा समाजासाठी, माझ्या लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा, समाधानाचा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे.", असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

Crime: तरुणीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, लग्नावरून येताना अपरहण, जंगलात नेऊन आरोपींनी केलं भयंकर कृत्य

Panvel Tourism : निसर्गरम्य दृश्यांची पर्वणी, 'पनवेल'मध्ये लपलाय ८०० वर्ष जुना ऐतिहासिक किल्ला

Firing: आधी ओलीस ठेवलं नंतर धाड धाड धाड गोळ्या झाडल्या; सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, ६ जणांचा मृत्यू

Akshaya Tritiya : फक्त १ रूपयांत खरेदी करा २४ कॅरेट गोल्ड, घरबसल्या Paytm, PhonePe आणि Jio Finance वर असे करा बुकिंग

SCROLL FOR NEXT