Manoj Jarange Patil Saam TV News
मुंबई/पुणे

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला यश; हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ जीआर काढून अंमलबजावणी

Manoj Jarange Patil’s Agitation: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सरकारकडून मोठं यश. हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय. गावातील, कुळातील आणि नात्यातील चौकशीनंतर कुणबी प्रमाणपत्र मिळणार.

Bhagyashree Kamble

  • मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सरकारकडून मोठं यश

  • हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय

  • गावातील, कुळातील आणि नात्यातील चौकशीनंतर कुणबी प्रमाणपत्र मिळणार

  • आंदोलकांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्याचा निर्णय

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं आंदोलन निर्णायक टप्प्यावर आलं आहे. कोर्टाने आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले होते. मात्र, याच आंदोलनाला आता मोठं यश मिळालं आहे.

मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं जाहीर करत, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच जीआर काढण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील, नात्यातील किंवा कुळातील व्यक्तींना चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल, असा महत्त्वाचा निर्णय उपसमितीने जरांगे पाटलांसमोर मान्य केला. 'हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी होईल,' अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

सरकारकडून मनोज जरांगेंच्या कोणत्या अटी मान्य

हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटलांनी केली होती. ही मागणी शासनानं मान्य केली.

हैदराबाद गॅझेटचा जीआर तासाभरात देण्याची मागणी. रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करू- जरांगे पाटील.

गावातील, कुळातील आणि नात्यातील व्यक्तींना चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सातार गॅझेटवर अभ्यास केला जाईल. जलद मान्यता मिळेल.

मराठा आंदोलकांवरील आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार आहे.

यासंबंधित तातडीने जीआर काढून आणि त्याची अंमलबजावणी करू, असा शब्द मराठा उपसमितीने केला.

मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केला असून, त्यावर जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.

मराठा उपसमितीने मनोज जरांगेंची भेट घेतली. मसुदामध्ये काय तरतूद केली याची माहिती दिली. मराठा उपसमितीमध्ये अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने बहिणींना चिरडले; थोरलीचा मृत्यू, धाकटी गंभीर जखमी

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सीडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड

Mahesh Manjrekar: आज शिवाजी महाराज असते तर...; महेश मांजरेकरांसह 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे कलाकार साई चरणी नतमस्तक

Surya Gochar Luck: सूर्य तूळ राशीत करणार मार्गक्रमण, मिथुन, सिंहसह आणखी एक रास होणार मालामाल

Jalgaon : धरणात पोहण्यासाठी उतरणे जीवावर बेतले; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT