Manoj Jarange Patil Saam TV News
मुंबई/पुणे

मुंबईत मराठ्यांचे हाल; ना खायला अन्न ना पाणी, गाडीतच स्वयंपाक अन् तिथेच जेवण, आंदोलकांनी रात्र कशी घालवली?

Manoj Jarange Patil: आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरू. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला. आंदोलकांना जेवण-पाणी, राहण्याच्या सोयींची प्रचंड गैरसोय.

Bhagyashree Kamble

  • आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरू.

  • मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला.

  • आंदोलकांना जेवण-पाणी, राहण्याच्या सोयींची प्रचंड गैरसोय.

  • सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची गर्दी, पोलिसांवर ताण.

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावं, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. आझाद मैदानावर मराठा बांधवांसह त्यांनी ठिय्या मांडला आहे. अशातच गैरसोयीमुळे आंदोलकांचे हाल होत आहे. २९ ऑगस्ट रात्र आंदोलकांनी कशीबशी घालवली. काहींचे मुंबईत पोहोचल्यानंतर प्रचंड हाल झाले. तरीही मराठा मागे हटले नाही.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा पवित्रा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. गैरसोय होणार, हे लक्षात घेत मराठा बांधवांनी आधीच काही जेवणाचे साहित्य सोबत घेतले होते. गेले २ दिवस त्यांनी गाडीतच स्वयंपाक केला होता, असे बळिराम पोळ म्हणाले.

आष्टी तालुक्यातील प्रशांत तरटे, मनोज तरटे इतर त्यांच्या ४ मित्रांनी एकत्र ट्रकमध्येच जेवण केले. जेवणाचे साहित्य सोबत घेऊनच आलो होतो, असं ते म्हणाले. काहींची खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झाली. वाडीबंदरला पोहोचल्यावर या भागांत एकही हॉटेल दिसलं नाही. चहाची टपरीही दिसली नाही, अशी माहिती आंदोलकांनी दिली.

आझाद मैदानालगत खाऊ गल्ली आहे. ती बंद ठेवण्यात आली. गल्ली खूप लहान आहे. प्रचंड गर्दी जमल्यास अनर्थ होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे आंदोलकांनी बोरा बिस्तरा उचलून थेट सीएसएमटी स्थानक गाठले. काही आंदोलकांनी तिथेच रात्र काढली. तेथील खाऊ गल्लीत न्याहरी केली. मात्र, काही आंदोलकांचे अतोनात हाल झाले.

दुपारनंतर आझाद मैदान आंदोलकांनी भरगच्च भरल्यामुळे काहींनी सीएसएमटी स्थानक गाठले. मुंबईकर आणि आंदोलकांच्या गर्दीचे नियोजन करताना जीआरपी आणि आरपीएफची कसरत झाली असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, जळगाव, नाशिक, नांदेड, सोलापूर, लातूर, धाराशिव, धुळे या भागातून सर्वाधिक आंदोलक आले असल्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Accident : गंगेत स्नान करून येताना काळाचा घाला, ६ जणांचा जागीच मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

मराठा आरक्षणाचा फटका EWS प्रवर्गाला! प्रवेशात तब्बल १५ टक्क्यांची घट|VIDEO

Pune Tourism : पुण्यातील 'हे' जुळे किल्ले कधी पाहिलं आहात का? पर्यटकांचे प्रमुख आकर्षण

SCROLL FOR NEXT