Chhagan Bhujbal Saam TV
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal: ओबीसींना आरक्षणातून ढकलून देण्याचा प्रयत्न; भुजबळांनी व्यक्त केली नाराजी

Political News: यासाठी आज छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी सायंकाळी बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. त्याआधी माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांनी असं म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

तबरेज शेख

Maratha Aarakshan:

कालच्या प्रकारानंतर कालपासून मागासवर्गीय, दलित आणि इतर लोकांचे मला मॅसेज येत आहेत. पुढे काय करायचे? असं विचारत आहेत. आमचं आरक्षण संपलं अशी घबराट नागरिकांमध्ये आहे, असं मंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय.

मराठा आरक्षाणाच्या मुद्द्यावरून सरकारने घेतलेल्या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. यासाठी आज छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी सायंकाळी बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. त्याआधी माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांनी असं म्हटलं आहे.

सगळीकडे एकतर्फी कारवाई केली जात आहे. क्युरेटिव्ह पिटीशन दाखल होण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. पण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायची गरज काय? असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री बोलतात पण आमच्या मनाचे समाधान होत नाही, असंही भुजबळांनी म्हटलंय. भुजबळांवर केलेल्या या वक्तव्याने ते मुख्यमंत्री शिंदेंवर नाराज असल्याची चर्चा सुरूये.

शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा समावेश होतोय. इतर ठिकाणीही ते वाटेकरी होणार. पंचायतीत एक दोन जण निवडून येत होते ते पण जाणार अशी भीती आहे. सर्वच मराठा समाजाला बॅक डोअर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे काम सुरू आहे, असंही भुजबळांनी यावेळी म्हटलं.

ओबीसींना आरक्षणातून ढकलून देत आहेत

निजामशाहीचा विषय होता नंतर सगळ्यांना घ्या हे सगळे हट्ट सरकार पुरवत आहे. पण कुणावर अन्याय नाही म्हणतात मग 54 लाख आणि त्याच्या दुप्पट तिप्पट लोक आणून ओबीसींना आरक्षणातून ढकलून देत आहेत, अशा शब्दांत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

SCROLL FOR NEXT