Dombivli Crime News, satara, youth saam tv
मुंबई/पुणे

Satara येथील युवकांना शस्त्रासह अटक, मानापाडा पाेलिसांची कारवाई

हे दोघे सातारा जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Dombivli Crime News : पिस्तूल विक्री करण्यासाठी एक युवक डोंबिवली येथील पांडुरंग वाडी परिसरात येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना (manpada police) मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी पांडुरंग वाडी परिसरात सापळा रचत युवकाला (youth) गावठी पिस्तूल व दोन जिवंत कडतूसांसह अटक (arrests) केली. (Maharashtra News)

डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांडुरंगवाडी येथे इसम गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी या इसमाचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले.

सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या पथकाने पांडुरंग वाडी परिसरात सापळा रचला. पांडुरंग वाडी परिसरातील एका हॉटेल जवळ एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला.

पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळुन आली. चौकशीत त्याचे नाव परशुराम करवले असे समजले. तो सातारा येथील राहणारा असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. त्याने याचप्रकारचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल सातारा येथील अक्षय जाधव याला विक्री केल्याचे त्याने पाेलिसांनी सांगितले.

मानपाडा पोलिसांच्या पथकाने सातारा गाठत अक्षय जाधव याला देखील अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हे दोघे सातारा जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

त्यांच्या विरोधात कराड ,वडुज, सातारा पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र विक्री व वाळु चोरीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती सुनील कुऱ्हाडे (एसीपी, डोंबिवली) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

Eknath Shinde : नोटीस कोणत्या अधिकाराने थांबवली? उच्च न्यायालयाचा एकनाथ शिंदेंना सवाल |VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Aishwarya Rai-Salman Khan Breakup : "तो भिंतीवर डोके आपटायचा..." लोकप्रिय दिग्दर्शकाचं ऐश्वर्या-सलमानच्या नात्यावर विधान

चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

SCROLL FOR NEXT