manpada police, dombivali
manpada police, dombivali saam tv
मुंबई/पुणे

एमआयडीसीतील सुरक्षा रक्षकाच्या खून प्रकरणी तिघे अटकेत

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली (dombivali) एमआयडीसी मधील फेज १ मधील विजय पेपर मिल कंपनीच्या सुरक्षा रक्षकाच्या खून प्रकरणात मानपाडा पोलीसांनी (manpada police) संशयित दाेन आरोपींना आठ तासांत अटक केली आहे. या प्रकरणात एका संशयित आराेपीचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलीसांनी (police) दिली. (dombivali latest marathi news)

डोंबिवली एमआयडीसी मधील फेज १ मधील विजय पेपर मिल कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची मंगळवारी मध्य रात्री हत्या झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली होती. ग्यानबहाद्दूर गुरुम (वय ६४) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून याला टणक हत्याराने मारहाण केली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी पाेलीसांनी वेगवेगळी पथक तयार करण्यात आली हाेती.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कसून तपास सुरु केला. त्याच प्रमाणे पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून यातील संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पहिल्या टप्प्यात पाेलीसांनी कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथील टोनी थॉमस डिसीव्हा उर्फ शिवा सोमा हिलम (वय ३०) याला ताब्यात घेतले. तर मानपाडा पोलिसांनी याच गुन्ह्यात भंगारवाला फिरोज खान (वय ३०) यास अटक केली.

त्यानंतर कल्याणच्या क्राईम युनिटने संतोष शिर्के यास ताब्यात घेतला. तो बस चालक आहे. त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणातील चौथ्या संशयित आरोपीचा शाेध पोलीस घेताहेत.

असा उघडीस केला गुन्हा

विजय पेपर मिल येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे जण भंगार चोरी केल्यानंतर एका ऑटो रिक्षातुन जात असल्याचे आढळुन आले. या ऑटो रिक्षाचे मागे एक बॅनर लावलेला होता. त्याप्रमाणे कल्याण व डोंबिवली परीसरातील सर्व ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यात एका ऑटो रिक्षावर लागलेला बॅनर कापलेला असल्याचे तपास पथकास आढळुन आले. या रिक्षाचा पाेलीसांनी पाठलाग करुन ती अडवली. त्याचा चालक पोलीसांना पाहुन पळुन जाऊ लागताच त्यास पकडून त्याची कसून चाैकशी करण्यात आली.

डोंबिवली पोलिसांचे आवाहन

दरम्यान या घटनेनंतर डोंबिवली एसीपी सुनील कुराडे आणि मानपाडा पोलीसांनी एमआयडीसी मधील कंपनी मालकांना खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. एमआयडीसी मधील ८७ कंपन्या बंद आहेत. कंपनी मालक यांनी कोणतीही सुरक्षा यंत्रणा तेथे ठेवलेली नाही. यापूर्वी लेखी देऊन सुद्धा खबरदारी घेतलेले नाही. कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे यापूढे सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्यात आणि खबरदारी घ्यावी असे आवाहन पाेलीसांनी कंपनी मालकांना केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT