Manoj Jarange vs Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

manoj jarange patil vs devendra fadnavis : मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय कलगीतुरा पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Tanmay Tillu

मुंबई : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर घणाघाती टीका करत ओपन चॅलेंज दिलंय. जरांगेंनी लोकसभेला मविआला झुकतं माप दिल्याचं म्हणत राऊतांनी जरांगेंवर तोफ डागलीये. महायुतीला पाडून महाविकास आघाडीला निवडून आणायचं पाप तुमच्या मनात नसेल तर तुम्ही महाविकास आघाडीकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतीची भूमिका लिहून घ्या, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून भूमिका लिहून मी घेईन असं म्हणत राऊतांनी जरांगेंना खुलं आव्हान दिलंय. यावर जरांगेंनीही पलटवार करत पुन्हा फडणवीसांना लक्ष्य केलंय. तर या वादात भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनीही उडी घेत जरांगेंवर निशाणा साधलाय.

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांना फडणवीस द्वेषानं पछाडलंय, असा आरोप केला. भाजप आमदार प्रवीण दरेकरांच्या आरोपानंतर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं. 'मला छेडून चूक केली. हा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला जरांगे फॅक्टरचा जबर फटका बसला.त्यामुळे आगामी विधानसभेत जरांगे फॅक्टर भाजपला डॅमेज करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात जरांगे सातत्यानं देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करतायत. अशातच अपक्ष आमदार राजेंद्र राऊतांनी जरांगेंविरोधात श़ड्डू ठोकले आहेत. राजेंद्र राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, जरांगे खंडोजी खोपडेच्या भूमिकेत येणार की प्रामाणिक मराठा म्हणून येणार याबाबत जरांगेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केलीये. लोकसभेत उदयनराजेंबाबत जरांगेंनी केलेल्या वक्तव्याचा गौप्यस्फोट यावेळी राजेंद्र राऊतांनी केलाय.

विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत..मात्र जरांगे आणि भाजपचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यात आता अपक्ष आमदार राजेंद्र राऊतांनीही उडी घेत जरांगेंना टार्गेट केलंय. राऊत हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी जरांगेंना दिलेलं खुलं आव्हान भाजपनंच दिल्याची चर्चा आहे. मात्र आता हे आव्हान जरांगे स्वीकारणार की वेगळी भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT