Manoj Jarange Patil Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil : मराठ्यांनी उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती

Maratha Reservation News : वंशावळीसाठी देखील समिती स्थापन केली आहे. ज्यांच्या कुणबी नोंद मिळाल्या त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, याबद्दल मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

प्रविण वाकचौरे

Maratha Reservation News :

मराठा आंदोलक म नोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं. मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: अध्यादेश घेऊन मनोज जरांगे यांच्या भेटीला वाशीत पोहोचले. त्यावेळी मराठा बांधवांनीदेखील मोठ्या जल्लोषात मुख्यमंत्र्यांचा स्वागत केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी मराठा बांधवांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील  यांनी म्हटलं की, 54 लाख नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी आपली मागणी होती. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सग्यासोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने तसा अध्यादेशही काढला आहे.

नोंदी मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळावी यासाठी शिबीर सुरु केली आहेत. वंशावळीसाठी देखील समिती स्थापन केली आहे. ज्यांच्या कुणबी नोंद मिळाल्या त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, याबद्दल मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  (Latest Marathi News)

मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा बांधवांनी जीवन संपवलं. आजचा दिवस पाहण्यासाठी खूप संघर्ष मराठा बांधवांना केला. अंतरवाली सराटीपासून येताना अनेकजण रस्त्यावर झोपले, उपाशी राहिले. आज मराठ्यांनी उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, अशी विनंती मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

SCROLL FOR NEXT